शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहा कोटींचे सौंदर्यीकरण गेले पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 22:49 IST

मध्य चांदा वनविभागातर्फे अंमलनाला धरणावर अंमलनाला पर्यटन स्थळाची निर्मिती करण्याकरिता दहा कोटी रूपये खर्च करून सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मात्र प्रारंभीच काम पाण्यात बुडाल्याने कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देअंमलनाला पर्यटन स्थळ : योग्य नियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : मध्य चांदा वनविभागातर्फे अंमलनाला धरणावर अंमलनाला पर्यटन स्थळाची निर्मिती करण्याकरिता दहा कोटी रूपये खर्च करून सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मात्र प्रारंभीच काम पाण्यात बुडाल्याने कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोरपना तालुक्यासह जिवती तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने अंमलनाला धरण शंभर टक्के भरला. दोन वर्षांनंतर वेस्टवेअरवरून पाणी सुरू झाले आहे. त्यामुळे आजमितीला येथे पर्यटकांची मोठी गर्दी आहे.अंमलनालाकडे पर्यटकांचे वाढते आकर्षण बघता, गेल्या जानेवारी महिन्यामध्ये अंमलनाला पर्यटन क्षेत्राच्या सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन आमदार संजय धोटे यांच्या हस्ते पार पडले. मात्र पहिल्याच पावसात संपूर्ण सौंदर्यीकरणाचे काम पाण्याखाली आले आहे.जवळपास दोन हेक्टर जागेमध्ये सुरू असलेल्या या कामाच्या जागेवर पूर्णपणे पाणी साचले असून संरक्षण भिंत पाण्याखाली आली आहे. अनेक कंत्राटदारांच्या माध्यमातून येथे वेगवेगळी कामे सुरू असून चुकीच्या नियोजनामुळे शासनाचा निधी व्यर्थ जाण्याची शक्यता दिसून येत आहे.वनविभागाने निवडलेल्या अभियंत्यांनी अभ्यासपूर्ण क्षेत्र न निवडल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. या ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम करण्याकरिता मुबलक जागा आहे. तरीही अगदी अंमलनाल्याला लागून पाण्याच्या जवळ काम केल्याने शासनाला दरवर्षी देखभाल-दुरुस्तीचा मोठा खर्च करावा लागणार आहे.महत्त्वाचे म्हणजे आजघडीला या ठिकाणी संपूर्ण दलदल झाल्याने सौंदर्यीकरणाचे काम करता येणे शक्य दिसत नाही.शासनाने या गंभीर बाबीची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन जागा निवडीबाबत फेरविचार करावा व केलेला खर्च लोकहिताचा व्हावा, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.रोप-वेच्या खाली प्रवेशद्वारदहा कोटींचे काम सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून माणिकगड सिमेंट कंपनीचे रोप-वे आहे. ऐन रोप-वे असलेल्या ठिकाणी बगीचाचे प्रवेशद्वार तयार करण्यात येत असून नागरिकांना जोखीम पत्करून रोप-वेच्या खालून बगीचामध्ये जाण्याची वेळ येणार आहे. रोप-वे मधील चलनामधून छोटे दगड पडून डोक्याला सुद्धा इजा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.