शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सावधान! घरकुलाच्या नावावर पैसे मागणारी टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

तुमच्या घरकूलासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे. त्यासाठी काही रकमेची गरज आहे. एवढेच नाही तर मी पूर्वीअमूक अमूक पंचायत समितीत कार्यरत होतो. माझी नुकतीच नागभीड पंचायत समितीत माझी बदली झाली आहे, असे सांगून विश्वास संपादन करीत आहे.सदर व्यक्ती या लोकांना एक मोबाईल नंबरही देत आहे. या भूलथापीला काही व्यक्ती बळीसुद्धा पडल्याचे माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देसंभावित घरकुलाची यादी तयार : नागभीड पंचायत समितीचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यातील दुर्गम भागातील गावात जाऊन घरकुलाच्या नावावर पैसे मागणारे काही सक्रीय झाले आहेत. अशांपासून सावध व्हावे, असे आवाहन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे.शासनाच्या वतीने घरकुलाची प्रपत्र ड मध्ये संभावित घरकूल लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. या यादीत गावातील अनेकांची नावे समाविष्ट झाली आहेत. या यादीत नाव असल्याने आपल्याला घरकुलाचा लाभ मिळणारच आहे. असे नागरिकांमध्ये वातावरण निर्माण झाले आहे. नेमक्या याच वातावरणाचा काहीजण गैरफायदा उचलत असून प्रपत्र ड मध्ये नाव असलेल्या नागरिकांच्या भेटी घेऊन तुम्हाला घरकूल मंजूर झाले असल्याचे सांगत आहेत. मी पंचायत समितीमधून आलो आहे. तुमचे घरकूल मंजूर आहे. तुमच्या घरकूलासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे. त्यासाठी काही रकमेची गरज आहे. एवढेच नाही तर मी पूर्वीअमूक अमूक पंचायत समितीत कार्यरत होतो. माझी नुकतीच नागभीड पंचायत समितीत माझी बदली झाली आहे, असे सांगून विश्वास संपादन करीत आहे.सदर व्यक्ती या लोकांना एक मोबाईल नंबरही देत आहे. या भूलथापीला काही व्यक्ती बळीसुद्धा पडल्याचे माहिती समोर आली आहे. सतर्क राहण्याच्या सूचना ग्रामसेवकांना देण्यात आल्या असून काही ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या दर्शनी भागावर अशा लोकांपासून सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत.ग्रामसेवकांना केले सतर्कतालुक्यातील मांगरूड ग्रामपंचायतीतंर्गत हुमा (खडकी) आणि पळसगाव ग्रामपंचायतीतंर्गत सावंगी या गावात असा प्रकार घडला. मात्र सावंगी येथील एका व्यक्तीला संशय आल्याने या व्यक्तीने नागभीड पंचायत समितीत घरकूल योजनेचे काम पाहणाऱ्या राजू बावणे या अधिकाºयास दूरध्वनीवरून माहिती दिली. या व्यक्तींनी दिलेला मोबाईल नंबर बावणे यांना दिला. योगायोगाने याचवेळी नागभिड पंचायत समितीत ग्रामसेवकांची सभा सुरू होती. बावणे यांनी ही बाब या बैठकीत कथन केली. याबाबत नागरिकांना सतर्क करण्याचे आवाहन केले. मोबाईल नंबरची पडताळणी केली असता हा नंबर बंद असल्याचे दिसून आले.घरकुल मिळवून देतो म्हणून तालुक्यात बोगस व्यक्ती नावे बदलून गावागावात फिरत असून पैशाची मागणी करीत आहेत. अशा व्यक्तींना कोणीही पैसे देऊन आपली फसवणूक करुन घेऊ नये. असे आढळल्यास तात्काळ ग्राम पंचायतच्या निदर्शनास आणून द्यावे. यासंदर्भात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.- प्रणाली खोचरेगटविकास अधिकारी, नागभीड

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाpanchayat samitiपंचायत समिती