शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, आता निष्काळजी नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूने तोंड वर काढले आहे. शेजारील जिल्ह्यात लाॅकडाऊन होण्याची स्थिती आहे. तर ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूने तोंड वर काढले आहे. शेजारील जिल्ह्यात लाॅकडाऊन होण्याची स्थिती आहे. तर नागपूर जिल्ह्यात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, ही धोक्याची सूचना आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ तसेच वर्धा जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने त्याचा परिणामही चंद्रपूर जिल्ह्यावर पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सावधान होण्याची गरज असून, आता निष्काळजी परवडणार नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत ९०४ रुग्ण ॲक्टिव्ह असून, ते विविध रुग्णालयात तसेच गृहविलगीकरणात आहेत.

कोरोनाने आपला पुन्हा उद्रेक सुरू केला आहे. विशेष म्हणजे, विदर्भात प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्याला नागरिकांची बेफिकिरी जबाबदार आहे. यामुळे केंद्रीय समितीने विदर्भाला पुन्हा सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा उद्रेक बघता नागपूरमध्ये लाॅकडाऊन केले आहे. तर जिल्ह्यालगत असलेल्या यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातही स्थिती गंभीर आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आता सतर्क होणे गरजेचे आहे. नागरिकांनी गाफील न राहता उपाययोजनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

बाॅक्स

लाॅकडाऊन टाळण्यासाठी हे करा

शेजारील जिल्ह्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. नागपूर, यवतमाळ तसेच अमरावतीमध्येही मोठ्या संख्येने रुग्णसंख्या आढळत आहे. त्यामुळे प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. उपाययोजनांकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढली तर नागपूरसारखेच चंद्रपूरला लाॅकडाऊन होऊ शकते; मात्र आता लाॅकडाऊन परवडणारे नसून, लाॅकडाऊन टाळायचे असल्यास प्रत्येकाने नियमांचे पालन करणे हाच एकमेव उपाय आहे. यामुळेच आता जिल्हावासीयांनी कोराेनाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे असून, प्रत्येकाने माॅस्क, सॅनिटायझर लावणे अत्यावश्यक आहे.