शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 05:00 IST

मूल तालुक्यातील जमिनीचे क्षेत्र ४६३९४.९८ हेक्टर असून, लागवडीचे क्षेत्र २६,२८८.१४ हेक्टर आहे. तालुक्यात धानाची लागवड २२,७८८.०० हेक्टरमध्ये केली जात असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी लाखो रुपयांची बी - बियाणे कृषी केंद्रातून विकत घ्यावी लागतात. हेच हेरुन विविध कंपन्या नकली बी - बियाणे विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे.

राजू गेडामलोकमत न्यूज नेटवर्कमूल : शेतीचा हंगाम सुरू झाला की, बोगस बी - बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या सक्रिय होतात. शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, या हंगामात बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाऊ नये म्हणून प्रशासनाने अशा विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे.मूल तालुक्यातील जमिनीचे क्षेत्र ४६३९४.९८ हेक्टर असून, लागवडीचे क्षेत्र २६,२८८.१४ हेक्टर आहे. तालुक्यात धानाची लागवड २२,७८८.०० हेक्टरमध्ये केली जात असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी लाखो रुपयांची बी - बियाणे कृषी केंद्रातून विकत घ्यावी लागतात. हेच हेरुन विविध कंपन्या नकली बी - बियाणे विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे. हे बघता शेतकऱ्याच्या हितासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांना कारवाईचे संकेत दिल्याने बोगस बी - बियाणे विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचे दिसून येते.शेतकऱ्यांचा शेतीचा हंगाम काही दिवसात सुरू होणार आहे. पहिल्या पावसात धानाची पेरणी करण्यासाठी अनेकांची धावपळ होताना दिसणार आहे. मूल तालुक्यात धान लागवडीचे क्षेत्र २२,७८८ हेक्टर असल्याने लाखो रुपयांचे बी - बियाणे विकत घ्यावे लागणार आहे. यात लाखो रुपयांची उलाढाल होत असते.  हीच संधी साधत मूल तालुक्यात अनेकांनी कृषी केंद्राचा परवाना काढल्याचे दिसून येते. मूल तालुक्यात एकूण ४५ कृषी केंद्र असून लाखो रुपयांचे बी - बियाणे विक्री केले जातात. हीच संधी साधून अनेक कंपन्या आडमार्गाने बोगस बी - बियाणे विकत असल्याच्या अनेक बाबी समोर आल्या आहेत.  

बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसानबियाणे बोगस निघाले की, शेतकऱ्याची हंगामात धावपळ सुरू होते. बियाणाची उगवण क्षमता नसल्याने त्याची तक्रार करण्यास वेळ लागतो. त्यामुळे ना कंपनीकडून भरपाई मिळते, ना शेतात पीक उगवते. असे विदारक चित्र निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना मानसिक त्रासासोबत आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.  ही परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने कृषी अधिकारी कार्यालयाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. गावातील खबऱ्याच्या रुपाने मूल शहरासह तालुक्यातील १११ गावात पाळत ठेवली जात आहे. त्यामुळे बोगस बी - बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मूल शहरासह तालुक्यात एकूण ४५ कृषी केंद्र आहेत. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या व चोर मार्गाने विक्री करणारे कृषी केंद्र याकडे कृषी विभागाचे विशेष लक्ष आहे. मूल तालुक्यातील गावागावात बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी खबरे ठेवण्यात आले आहेत. यानंतरही बोगस व आडमार्गाने बियाणे विक्री करण्याची माहिती मिळाली तर त्वरित कारवाई करण्यात येणार आहे.- भास्कर गायकवाड, तालुका कृषी अधिकारी, मूल.

 

टॅग्स :agricultureशेती