शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सावधान! ऑनलाईन फसवणुकीचा नवा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 05:00 IST

एक टेक्स्ट मेसेज आला. यामध्ये आपले भरलेले विद्युतबिल अपडेट न झाल्याने आज रात्री साडेनऊपासून आपल्या घरचा विद्युतपुरवठा खंडित करीत असल्याचे नमूद होते. या संदर्भात वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी 7908750087 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले होते. हा संदेश वीज वितरण विभागाच्या अधिकृत नंबरवरून न येता तो एका खाजगी क्रमांकावर असल्याने तो बनावट असल्याचे प्रा. डाखरे यांना लगेच लक्षात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपले वीज देयक थकीत असल्यामुळे आपला विद्युतपुरवठा आज रात्रीपासून खंडित करण्यात येणार असल्याचा संदेश पाठवून  नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्याचा नवीन फंडा भामट्यांनी शोधला आहे. या माध्यमातून हे भामटे नागरिकांना गंडा घालण्याच्या तयारीत आहे. असाच काहीसा प्रकार शहरातील एका प्राध्यापकासोबत घडला. मात्र त्यांच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळून लावण्यात आला.

झाले असे की, शहरातील लक्ष्मीनगर येथे वास्तव्यास असलेले प्रा. संतोष डाखरे यांच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज आला. यामध्ये आपले भरलेले विद्युतबिल अपडेट न झाल्याने आज रात्री साडेनऊपासून आपल्या घरचा विद्युतपुरवठा खंडित करीत असल्याचे नमूद होते. या संदर्भात वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी 7908750087 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले होते. हा संदेश वीज वितरण विभागाच्या अधिकृत नंबरवरून न येता तो एका खाजगी क्रमांकावर असल्याने तो बनावट असल्याचे प्रा. डाखरे यांना लगेच लक्षात आले. मात्र भामट्यांची ऑनलाइन फसवणूक करण्याची पद्धती जाणून घ्यायची असल्याने त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधला. 

अशी होते फसवणूकविद्युत पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने आपण दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता आपण मागील देयकाचा भरणा केलेला असतानाही तो अपडेट न झाल्याने सिस्टिममध्ये दाखवीत नसल्याचे सांगण्यात येते. संभाषण सुरू असतानाच आपल्याला टीम व्हिएवर (Team viewer)  नामक ॲप प्लेस्टोअर वरून डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर ते इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते. त्यानंतर ॲप सुरू करण्यास सांगून त्यातील आयडी क्रमांक आपणास विचारला जातो. आपण समोरच्या व्यक्तीस हा आयडी नंबर दिल्यास आपल्या मोबाईलचा ताबा समोरच्या व्यक्तीकडे जातो आणि या माध्यमातून तो बसल्या ठिकाणी तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतो.

भामट्यांनी फोनवरून दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत असल्याचे भासवून डाखरे यांनी फसवणुकीची ही पद्धती जाणून घेतली.

शेवटी  डाखरे यांच्याकडून समोरील व्यक्तीला मराठीतून बोलण्याचा आग्रह धरला असता फोन बंद करण्यात आला. दिवसेंदिवस ऑनलाइन फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातही घडत आहे. अनेक जण फसवणूकीनंतर तक्रार करत नाही, हेही वास्तव आहे.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम