शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाकाली भाविकांसाठी मनपाकडून मूलभूत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:08 IST

आराध्य दैवत माता महाकाली देवीची यात्रा सुरू झाली आहे. यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑ व आंध्र प्रदेशातून येतात. भाविकांना सोईसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने शहर महानगर पालिकेच्या वतीने यात्रा परिसरातच मंगळवारी कार्यालय सुरू केले.

ठळक मुद्देमहाकाली यात्रेला प्रारंभ : देवस्थान परिसरात यात्रा कार्यालय सुरू

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : आराध्य दैवत माता महाकाली देवीची यात्रा सुरू झाली आहे. यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑ व आंध्र प्रदेशातून येतात. भाविकांना सोईसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने शहर महानगर पालिकेच्या वतीने यात्रा परिसरातच मंगळवारी कार्यालय सुरू केले. या कार्यालयातून भाविकांना आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत सेवा व दुकानदारांना जागा वाटप करणे आदी सेवा पुरविण्यात येत आहेत.महापौर अंजली घोटेकर यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी पालिकेचे गटनेते वसंत देशमुख, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा हजारे, महाकाली प्रभागाचे नगरसेवक नंदू नागरकर आशा आबोजवार आदी उपस्थित होते. सर्वप्रथम महापौर घोटेकर यांचे हस्ते माता महाकालीच्या प्रतिमेची पूजन करून कार्यालयाचे फीत कापण्यात आले. पालिकेतर्फे भाविकांना देण्यात आलेल्या सुविधांबाबत महापौर घोटेकर यांनी यांनी सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाप्रसंगी सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, प्रमुख वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) नितीन कापसे, नामदेव राऊत, रवी हजारे, विवेक पोतनुरवार, भुपेश गोठे, उदय मैलारपवार यांनी मोलाची भूमिका बजावली. प्रास्ताविक व संचालन विवेक पोतनुरवार यांनी केले. आभार धनंजय सरनाईक यांनी मानले. नगरसेवक नागरकर यांनी महाकली मातेच्या इतिहासावर प्रकाश टाकला. चंद्रपुरात राज्यभरातून भाविक येतात. त्यांना योग्य सुविधा देण्याची जबाबदारी पालिकेची आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहेत. शहरातील नागरिकांनीही पालिकेला सहकार्य करून धार्मिक कार्याची प्रतिष्ठा कायम राखावी. यावेळी सतिश घोनमोडे, कल्पना लहामगे, शितल कुळमेथे गायत्री सरनाई तर नोडल अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, पोलीस विभागातर्फे सहा. पोलीस निरीक्षक ठाकूर व प्रमोद चिंचोळकर, मनपा कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी १०८ अ‍ॅम्बुलन्सवरील डॉक्टर व नागरिक उपस्थित होते. सर्वांना मिठाई व अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.