शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बॅरि. खोबरागडे यांचे कार्य प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:40 IST

असामान्य व्यक्तिमत्त्व आणि त्याला कर्तृत्वाची जोड दिल्यामुळेच बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांचे कार्य व कर्तृत्व देशपातळीवर पोहोचले आहे. सर्वसमावेशक वृत्तीमुळे त्यांनी चंद्रपूरचा नावलौकिक देश पातळीवर वाढविले. त्याचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : जयंती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : असामान्य व्यक्तिमत्त्व आणि त्याला कर्तृत्वाची जोड दिल्यामुळेच बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांचे कार्य व कर्तृत्व देशपातळीवर पोहोचले आहे. सर्वसमावेशक वृत्तीमुळे त्यांनी चंद्रपूरचा नावलौकिक देश पातळीवर वाढविले. त्याचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.मंगळवारी बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ुबॅरि. राजाभाऊ खोबरागडे मेमोरियल चंद्रपूर व खोबरागडे परिवारातर्फे स्थानिक बॅरि. राजाभाऊ खोबरागडे चौकातील बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांच्या पुतळ्याला मालार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. आली. त्यानंतर खोबरागडे भवन येथे बुद्ध-धम्म-संघ वंदना घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, काँग्रेस नेते राहुल पुगलिया, मनपाचे उपमहापौर अनिल फुलझेले, रिपब्लिकन नेते प्रविण खोबरागडे, नगरसेवक राहुल घोटेकर, सतीश घोडमोडे, नगरसेविका सविता कांबळे, आदी उपस्थित होते.केंद्रीय राज्यमंत्री अहीर पुढे म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बॅ. खोबरागडे यांनी आपले कर्तृत्व पणाला लावले. खऱ्या अथार्ने ते बाबासाहेबांचे सहकारी आणि असामान्य उंचीचे नेते होते. डॉ. बाबासाहेबांच्या पश्चात त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याला वाहून घेतांना त्यांनी संगठकांची भूमिका उत्तम वठवल्याने त्यांना देशपातळीवर सन्मान प्राप्त झाला. अशा या महान नेत्यांचे विचार समता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी अंगिकारावे, असे ते म्हणाले. याप्रसंगी उपस्थितांनी अभिवादन केले. त्यानंतर हेमंत शेंडे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला.