शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! वाघ आला अंगावर, त्याने तिला मृत्यूच्या जबड्यातून खेचून आणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2022 22:58 IST

सोमेश्वरच्या हातात कुऱ्हाड घेऊन वाघाच्या दिशने धावून गेला. या पवित्र्याने सविताला जबड्यात घेतलेला वाघही गांगरून गेला. पण सविताला जबड्यात घेतलेला वाघही जागचा हलत नव्हता आणि सविताचा पती सोमेश्वरही माघारी वळायला तयार नव्हता. हळूहळू सोमेश्वर वाघाजवळ पोहोचला आणि वाघावर कुऱ्हाड उगारून त्याने सवितास वाघाच्या जबड्यातून बाहेर काढून वाघाकडे पाहत माघारी पावलाने सवितास काही अंतर ओढत नेले.

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कोणाचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. त्याने तिला खरोखरच साक्षात मृत्यूच्या जबड्यातून ओढून आणले. त्याच्या या हिमतीची आणि ढोरपा शिवारात घडलेल्या या थराराची परिसरात चांगलीच प्रसंशा होत आहे. सोमेश्वर भुरले असे या जिगरबाज व्यक्तीचे नाव असून तो तालुक्यातील ढोरपा येथील रहिवासी आहे. सोमेश्वर पत्नी सवितासह स्वतःच्या शेतावर गेला होता. पत्नी धान कापणीनंतर शेतात पडलेल्या धानाच्या ओंब्या वेचत होती. तर सोमेश्वर बाजूच्याच बांधात गवत कापत होता. सविता ओंब्या वेचण्याच्या कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने ती भांबावली. मात्र प्रसंगावधान राखून तिने वाचवा वाचवा असा आरडाओरडा केला. या आवाजाने बाजूलाच गवत कापत असलेला तिचा पती आवाजाच्या दिशेने धावला. मात्र त्याच्या पत्नीला वाघाच्या रूपाने आलेला साक्षात काळच फरफटत ओढून नेत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. पण स्वतःचा तोल ढळू देता आणि खंबीर मनाने तो त्या प्रसंगाला सामोरा गेला. पत्नीला फरफटत नेत असलेल्या वाघाच्या दिशेने तो धावला आणि स्वतःजवळ असलेली कुऱ्हाड वाघाच्या दिशेने फेकून मारण्याचे नाटक करीत दबक्या पावलांनी वाघाजवळ गेला.वाघ जागचा हलेना, पतीही माघारी वळेना!- सोमेश्वरच्या हातात कुऱ्हाड घेऊन वाघाच्या दिशने धावून गेला. या पवित्र्याने सविताला जबड्यात घेतलेला वाघही गांगरून गेला. पण सविताला जबड्यात घेतलेला वाघही जागचा हलत नव्हता आणि सविताचा पती सोमेश्वरही माघारी वळायला तयार नव्हता. - हळूहळू सोमेश्वर वाघाजवळ पोहोचला आणि वाघावर कुऱ्हाड उगारून त्याने सवितास वाघाच्या जबड्यातून बाहेर काढून वाघाकडे पाहत माघारी पावलाने सवितास काही अंतर ओढत नेले. यानंतर वाघ काही अंतरावर दूर गेला. - नंतर क्षणाचाही विलंब न लावता त्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांची मदत घेत पत्नी सविताला दवाखान्यात नेले. सवितावर आता ब्रम्हपुरी येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

 

टॅग्स :Tigerवाघ