शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बँका उघडल्या, ग्राहकांची झुंबड

By admin | Updated: November 16, 2016 00:54 IST

गुरूनानक जयंतीनिमीत्त सोमवारी बँकांना सुट्टी होती. या दिवशी एटीएमही बंद होते.

एटीएमसमोर लांबच लांब रांगा : बँकांमध्येही तोबा गर्दीचंद्रपूर : गुरूनानक जयंतीनिमीत्त सोमवारी बँकांना सुट्टी होती. या दिवशी एटीएमही बंद होते. मंगळवारी बँका व एटीएम पुर्ववत सुरू झाले आणि नोटा बदलीसाठी ग्राहकांची एकच झुंबड उडाली. एटीएमसमोर लांबच लांब रांगा तर बँकांमध्येही तोबा गर्दी दिसून आली. ५०० व १००० रूपयाच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या घोषणेला आठ दिवस लोटले आहेत. गेल्या मंगळवारच्या रात्रीपासून नोटा बदलीसाठी ग्राहकांची भागम्भाग सुरू आहे. ग्राहकांना नोटा बदलता यावे, यासाठी शनिवार व रविवारीही बँका सुरू होत्या. मात्र सोमवारी गुरूनानक जयंतीनिमीत्त बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळाली. मंगळवारी सकाळी बँका जेव्हा सुरू झाल्या, तेव्हा गेल्या चार दिवसांसारखीच परिस्थीती बघायला मिळाली. बँकेत आणि एटीएमसमोरही लांबच लांब रांगा लागल्याने अनेक ग्राहक त्रस्त दिसून आले. मात्र ५०० व १००० च्या नोटा व्यवहारात स्वीकारले जात नसल्याने नाईलाजास्तव अनेकांना नोटा बदली व एटीएममधून पैसे काढावे लागल्याचे दिसून आले. रेल्वे, रूग्णालये, पेट्रोल पंपावर २४ नोव्हेंबर पर्यंत ५०० व १००० च्या नोटा स्वीकारले जाणार असून मनपा, वीज वितरण आदी ठिकाणीही शासकीय कराची देयके ५०० व १००० च्या नोटांद्वारे स्वीकारले जात आहे. त्यामुळे कर भरणाऱ्यांची गर्दी वाढतच असून आतापर्यंत कोटींच्या घरात करवसुली झाली आहे. सध्या परिस्थीती सुधारण्याला आणखी काही दिवस लागणार असून गर्दी कायम राहण्याचे चिन्ह आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)सध्या उधारीवर सुरू आहेत व्यवहार ४००० हजार रूपये पर्यंत नोटा बदली करून दिले जात असून एटीएममधून २४०० रूपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र ज्यांना बँकेद्वारे दोन हजार रूपयाची नवी नोट मिळाली त्यांना त्या नोटचे सुट्टे पैसे मिळवण्यासाठी मोठी कसरतच करावी लागत आहे. पाचशे रूपयाची नवी नोट चलनात यायची असल्याने दोन हजार रूपयाच्या नव्या नोटेच्या बदल्यात सुटे पैसे १०० रूपयाच्या नोटा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकांचे व्यवहार उधारीवर सुरू आहेत.शेतकऱ्यांसमोर बियाणे खरेदीचा पेचसध्या रबी हंगामाची लगबग सुरू असून शेतकरी या कामात व्यस्त आहेत. मात्र ५०० व १००० च्या नोटा बाद झाल्याने बियाणे खरेदीसाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकरीही उधारीवरच बियाणांची खरेदी करताना दिसत असून काही जण उधारी देण्यास नकार देत असल्याने रबी पीक पेरणीची अडचण अनेकांना निमारण झाली आहे.