शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बँकांनो, तरुणांना कर्ज नाकारू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:55 IST

जिल्हयातील सुशिक्षीत तरुणांना कर्ज देण्यास बँक उत्सुक नसल्याच्या तक्रारी काही ठिकाणावरुन आल्या आहेत. तर काही ठिकाणी कोटा पूर्ण झाला, गॅरंटर हवा अशा चुकीच्या सबबीवर कर्ज देण्यास नकार दिल्याचे आढळून येत आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : मुद्रा बँक कर्ज योजनेचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हयातील सुशिक्षीत तरुणांना कर्ज देण्यास बँक उत्सुक नसल्याच्या तक्रारी काही ठिकाणावरुन आल्या आहेत. तर काही ठिकाणी कोटा पूर्ण झाला, गॅरंटर हवा अशा चुकीच्या सबबीवर कर्ज देण्यास नकार दिल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे तरुणांना बँकेतून परत पाठवू नका, कोणत्याही कारणासाठी मुद्रा बँक योजनेतून कर्ज नाकारु नका, पतपुरवठा करण्यासाठी कोणतीही अट नसून प्रत्येकाला कर्ज देता येईल, अशा पध्दतीने बँकेने तरुणांना मदत करावी, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या.प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान, खरीप कर्ज वाटप व विविध योजनातून जिल्ह्यातील बँका, विविध मंडळे यांच्याकडून होत असलेल्या पतपुरवठा व त्यावर आधारित राज्य व केंद्राच्या विविध योजनांचा आढावा केंद्रीयय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी सोमवारी घेतला. यावेळी त्यांनी वरील सूचना केल्या.या बैठकीला आमदार नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मनपा आयुक्त संजय काकडे, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा व जिल्ह्यातील सर्व बँकाचे प्रमुख उपस्थित होते.यावेळी तालुकानिहाय बँकाचा आढावा घेण्यात आला. मुद्रा बँक योजनेच्या संदर्भातही आढावा घेण्यात आला.यावर्षी मार्च अखरेपर्यंत १४७.५२ कोटी रुपयांचे कर्ज या योजनेअंतर्गत देण्यात आले आहे. या कर्जासाठी जिल्हाभरातून १७ हजार ५१० लोकांनी अर्ज दाखल केले होते. लोकप्रतिनिधींकडे या योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आल्या असून स्वत: प्रधानमंत्री या योजनेबाबत अतिशय सकारात्मक असून बँकांनी पतपुरवठा करताना विनाकारण अटी व शर्ती घालू नये.कर्ज घेणाºया नागरिकांनीदेखील अल्पदरातील कर्ज व्यवसाय सुरु करताच परत करावे. अन्य लोकांनादेखील त्याचा फायदा मिळेल, असेही ना. अहीर म्हणाले. यावेळी काही तक्रारींचा त्यांनी उल्लेख केला. तसेच उपजिविका विकास योजनेंतर्गत सुरु असलेल्या व्यवसायाचा आढावाही त्यांनी घेतला. जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्वंय सहायता समुहाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या लघु उद्योगाची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली. यावेळी सर्व बँकांचे अधिकारी व इतर योजनेशी संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती.पीक कर्जाचा आढावायावेळी जिल्हयातील सर्व बँकांना पीक कर्ज वाटपाबाबत ना. अहीर यांनी सूचना केली. पीक कर्ज वाटपात हयगय होऊ देऊ नये, याबद्दल त्यांनी काळजी घ्यायला सांगितली. सन २०१८-१९ या वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मिळून चंद्रपूर जिल्हयाचा पीक कर्जाचे १०३६.२६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सदर उद्दिष्ट सर्व बँकांना कळविण्यात आले असून बँकनिहाय पीककर्ज वाटपाची सूचना सर्व बँकांना देण्यात आली आहे. बँकानी शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करावे, असेही त्यांनी सांगितले.