शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचारीच करतात खातेदारांशी अरेरावी

By admin | Updated: April 12, 2015 00:46 IST

येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी खातेदरांशी असभ्यपणे वागतात.

अध्यक्ष व संचालकांकडे तक्रार : महिला कर्मचाऱ्यांना समज देण्याची मागणीभद्रावती: येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी खातेदरांशी असभ्यपणे वागतात. एवढेच नाही तर वयोवृद्ध खातेदरांशीही अरेरावी करतात, अशी तक्रार अध्यक्ष आणि संचालक मंडळाकडे काही खातेदारांनी केली आहे.जिल्हा सहकारी बँकेच्या येथील शाखेत महिला कर्मचाऱ्यांचा अधिक भरणा आहे. त्यांच्याकडून खातेदारांना उत्तम सेवा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र येथील चित्र उलट आहे. येथील महिला कर्मचारी व अधिकारी सौजन्याने तर सोडाच, साधी माहिती विचारली असता वयोवृद्धांसोबतही हमरीतुमरीची भाषा वापरतात. या बँकेशी ग्रामीण भागातील शेतकरी व कामगार ग्राहक मोठ्या संख्येने जुळले आहेत. तसेच जिल्हा परिषद कर्मचारी, सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी, महिला बचत गट, विजेचीे देयके आदी व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे या बँकेत नेहमीच ग्राहकांची गर्दी असते. मात्र बँकेत कार्यरत महिला कर्मचारी खातेदारांंशी मग्रुरीची भाषा वापरतात अशी तक्रार आहे. या साऱ्या प्रकाराने येथे दररोज गोंधळाचे वातावरण असते. बँकेतील देवाण घेवाणीच्या व्यवहारासाठी खातेदारांना तासन् तास ताटकळत उभे राहावे लागते. त्यातच कर्मचाऱ्यांच्या असभ्य वर्तनाचा मन:स्ताप सहन करावा लागतोे. कर्मचाऱ्यांनी चांगली वागणूक द्यावी, यासाठी त्रस्त खातेदारांनी बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी) वीज देयक भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारावावीज वितरण कंपनीच्या विद्युत बिलाच्या देयकांचा भरणा एकाच कॅश काऊंटरवरुन होत असल्याने त्या काऊंटरवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे वीज देयक भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात यावा, अशी मागणी आहे. तसे झाल्यास इतर नियमित ग्राहकांना आपले व्यवहार करण्यासाठी त्रास होणार नाही. या गर्दीचा फायदा घेवून काही असामाजिक तत्व मंडळी आपला उद्देश साध्य करण्यासाठी या बँकेतील ग्राहकांना केव्हा शिकार बनवतील, याचा नेम नाही.