शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदीचा जिल्ह्यात बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:16 IST

काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यात प्लास्टिक पिशवीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभावी अंमलबजावणीसाठी दुकानांवर धाडीही घातल्या. त्यामुळे दुकानदार धास्तावले होते. मात्र आता पुन्हा प्लास्टिकने दुकानांमध्ये डोके वर काढले आहे.

ठळक मुद्देकारवाई नाही : प्रशासनाचे व्यावसायिकांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यात प्लास्टिक पिशवीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभावी अंमलबजावणीसाठी दुकानांवर धाडीही घातल्या. त्यामुळे दुकानदार धास्तावले होते. मात्र आता पुन्हा प्लास्टिकने दुकानांमध्ये डोके वर काढले आहे.बंदीनंतर सामान्य नागरिक प्लास्टिक पिशव्याचे दुष्पपरिणाम लक्षात घेता गाडीच्या डिक्कीत एखादी कापडी पिशवी घालून भाजीपाला आणत होता. अलीकडे कुठल्याही दुकानात कॅरीबॅग सहज मिळत आहे.प्लास्टिकमुळे विविध आजार पसरत असून त्याचे विघटन देखील होत नसल्याने प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी महाराष्टÑ शासनाकडून प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अंमलबजावणी काटेकोरपणे होताना दिसत नाही. पानठेला, आठवडी बाजार, किरणा दुकान, हॉटेल, व्यावसायिक व रस्त्यावरील दुकान, छोटेमोठे व्यापारी यांच्याकडून प्लास्टिक पिशव्यांचे सर्रास वापर होत आहे. मात्र प्रशासन या बाबींकडे कानाडोळा करीत असून शासनाच्या या चांगल्या निर्णयाला हरताळ फासल्या जात आहे. प्लास्टिक पिशव्या मिळत असल्यामुळे ग्राहकही बिनधास्तपणे या पिशव्यांचा वापर करीत आहेत. शासनानी बंदी आणलेली प्लास्टिक पिशव्या वापरण्यात येऊ नयेत यासाठी नागरिकांमध्ये व शाळा, विद्यालयामध्ये जनजागृती करून प्रशासनाने दुकानदारांवर कारवाई करणे गरजेचे आहे.बंदीच्या वेळी दुकानदारांनीही प्लास्टिक बंदीचे स्वागतच केले होते. मात्र सरकार जाणीवपूर्वक बंदीचा ढोंग करते असे व्यावसायिकांचे मत आहे. दुकानातून कॅरीबॅग बंद करण्यापेक्षा कॅरीबॅगची कंपनीच बंद केली तर या अडचणी येणार नाहीच असेही व्यावसायिकांचे मत आहे. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी