शरद बेलोरकर यांना रासेयोचा पुरस्कार
गडचांदूर : येथील शरदराव पवार महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शरद बेलोरकर यांना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार, महाविद्यालयाला उत्कृष्ट रासेयो पुरस्कार प्राप्त झाला आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो विभागातर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याला कुलगुरू डॉ. श्रिनिवास वरखेडी, भारतीय शिक्षण मंडळाचे महामंत्री मुकुल कानिटकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, डॉ. बिनीवले, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल चिताडे, रासेयो समन्वय डॉ. नरेश मडावी उपस्थित होते.
तेली समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ता हजारे
चंद्रपूर : अखिल भारतीय तेली समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. दत्ता हजारे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून त्यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी हजारे यांनी समाजाच्या विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे.
केवळराम पारधी यांची नियुक्ती
ब्रह्मपुरी : तालुक्यातील सोंदरी येथील केवळराम वासुदेव पारधी यांची पिंपळगाव मालडोंगरी जिल्हा परिषद गणाच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखपदी प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय काळे यांच्या निर्देशानुसार केवळराम पारधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.