शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पीओपी मूर्ती विक्रीवर बंदी घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:40 IST

पीओपी मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणात जल व जमीन प्रदूषण होते. मात्र तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात पीओपीच्या मूर्ती बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनपाने पुढाकार घेऊन पोअीपी मूर्ती विक्रीवरच सरसकट बंदी घालावी, अशी मागणी कुंभार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकुंभार समाजाची मागणी : पोअीपी मूर्तीमुळे जमीन व जल प्रदूषणात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पीओपी मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणात जल व जमीन प्रदूषण होते. मात्र तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात पीओपीच्या मूर्ती बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनपाने पुढाकार घेऊन पोअीपी मूर्ती विक्रीवरच सरसकट बंदी घालावी, अशी मागणी कुंभार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.चार दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशभक्त गणेशाच्या स्वागताची तयारी करीत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पीओपी मूर्तीचा समावेश आहे. या मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्यामुळे शासनाने या मूर्तीच्या विर्सजनावर बंदी घातली आहे. गणेशभक्तांना या मूर्तीचे विर्सजन जलकुंडामध्ये करता येते.मात्र जलकुंडामध्ये विर्सजन केल्यानंतर जमा झालेले मूर्तीचा मलबा जमिनीमध्ये पुरण्यात येत असते. मलबा जमिनीत पुरण्यात येत असल्यामुळे जमिनीसुद्धा प्रदूषण होत असते. त्यामुळे प्रशासनाने या मुर्र्तीच्या विक्रीवरच बंदी घालावी, अशी मागणी समाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतूरे, सुभाष तेटवार, अ‍ॅड. हरीश मंचलवार, शाहिदा शेख, संजय मार्कंडवार, रवी येरावार, रोशन इसलवार, राकेश राजुरकर यांनी केली.मनपाने पुढाकार घ्यावाशासनाने पीओपी मूर्तीच्या विर्सजनावर बंदी घातली आहे. मात्र जलकुंडामध्ये मूर्तीचे विर्सजन करता येते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था पीओपी मूर्तीच्या विक्रीवर बंदी घालू शकते. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र चंद्रपूरात अशी बंदी घातली नाही. त्यामुळे सर्रास पीअीपी मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे अनेक गणेश मंडळ पीओपी मूतीची स्थापना करतात आणि त्याचे विसर्जन जलकुंभामध्ये करतात. आणि जलकुंभात विर्सजन झालेला मलमा जमिनीमध्ये पुरत असल्याने जमिनीचे प्रदूषण होते. त्यामुळे मनपाने पुढाकार घेऊन बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.मनपामध्ये बैठकमागील काही दिवसांपूर्वी मनपामध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कुंभार समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी समाजातील पदाधिकाऱ्यांनी पीओपी मूर्तीवर बंदी घालण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र मूर्तीवर बंदी घालण्यामध्ये मनपा उदासीन दिसली. आम्ही जनजागृती करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र जनजागृतीही मोठ्या प्रमाणात करत नसल्याने अनेकजण पीओपीच्या मूर्तीची खरेदी करीत आहेत.