शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी यांना बामसेफचे निवेदन

By admin | Updated: September 1, 2015 00:47 IST

हरियाणातील रोहतक येथे स्वामी दयानंद सरस्वती विश्वविद्यालयातील विधी विभागामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये आयोजित केलेल्या ...

मागणी : घटनेची चौकशी कराचंद्रपूर : हरियाणातील रोहतक येथे स्वामी दयानंद सरस्वती विश्वविद्यालयातील विधी विभागामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये आयोजित केलेल्या बामसेफच्या २० व्या हरियाणा राज्य अधिवेशनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून नारेबाजी केली आणि अधिवेशन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी बामसेफ आणि मूलनिवासी संघ जिल्हा शाखा चंद्रपूरचे वतीने राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हरियाणा यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत निवेदन देऊन करण्यात आली.बामसेफचे अधिवेन शांतपणे सुरू असताना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी हॉलच्या मुख्य दरवाजाला बाहेरुन कुलूप लावून अधिवेशनात बाधा आणली. बामसेफच्या कार्यकर्त्यांनी राज्य अधिवेशन घेण्यासाठी रितसर परवानगी घेतली होती व हॉलचे भाडेही भरले होते. तरीपण एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी अधिवेशनामध्ये येऊन धुडघुस घातला. बामसेफच्या कार्यकर्त्यांनी विश्वविद्यालयाच्या रजिस्ट्रारला याची माहिती दिली. एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना तेथून निघून जाण्यासाठी सांगावे त्यासाठी सुरक्षा रक्षकांचे किंवा पोलिसांचे सहकार्य घेऊन आम्हाला सहकार्य करावे, अशी विनंती केली. त्याप्रमाणे रजिस्ट्रारने पोलिसांना पाचारण केले. पण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जर हाताबाहेर गेली तरच आम्ही हस्तक्षेप करु, असे बोलत पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे बामसेफचे कार्यकर्ते अस्वस्थ होवून मुख्य दरवाजाकडे जात असताना धुडगूस घालणाऱ्या एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना समजावून न सांगता बामसेफ व मूलनिवासी संघाच्या कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला आणि एबीव्हीपीच्या गुंड कार्यकर्त्यांना पाठिशी घालून प्रोत्साहन दिले. त्यामुळे बामसेफच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध म्हणून प्रशासनाच्या विरोधात धरणा प्रदर्शन केले.बामसेफ व मूलनिवासी संघ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून देशभरात एससी, एसटी, ओबीसी व धर्मांतरित अल्पसंख्याक समाजामध्ये जनजागृती करीत असल्यामुळे हा समाज मोठ्या प्रमाणात फुले, शाहु, आंबेडकर विचारधारेचा स्वीकार करीत आहे. त्यामुळे ब्राम्हणवादी व्यवस्थेत मोठा हादरा बसत असल्यामुळे ते देशविघातक कृत्य करीत आहेत, असे बामसेफचे म्हणणे आहे. शिष्टमंडळात येष्ठ कार्यकर्ते एस.सी. सहारे, एम.टी. साव, जी.के. उपरे, के.के. शेंडे आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)