शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
4
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
5
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
6
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
7
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
8
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
9
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
10
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
13
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
14
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
15
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
16
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
18
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
19
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
20
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या

अव्वाच्या सव्वा वीज बिलाने बल्लारपूरकरांना शाॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:27 IST

मंगल जीवने बल्लारपूर : मागील मे, जून, जुलै या तीन महिन्यांचे बिल वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा आल्याने बल्लारपूरकर जाम ...

मंगल जीवने

बल्लारपूर : मागील मे, जून, जुलै या तीन महिन्यांचे बिल वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा आल्याने बल्लारपूरकर जाम संतापले आहेत. वीज आकार युनिटमुळे वाढला असून, युनिटची मर्यादा २०० पर्यंत वाढवावी तसेच स्थिर आकार व वहन आकार बंद करण्याची मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.

वीज ग्राहकांच्या तक्रारीनुसार मागील तीन महिन्यांत वीज ग्राहकांना दोन ते दहा हजारांच्या वर वीज बिल आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे युनिट दर आहे. वीज बिलात १०१ युनिटनंतर वाढ होत असते. जिल्ह्याचे उष्णतामान जास्त असल्यामुळे घरातही २०० युनिटच्या वर वीज जळते. यामुळे वीज दर दुप्पट होतो व बिलही दुप्पट होते. कोरोना संकटामुळे मध्यमवर्गीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अशात एवढे बिल भरणे अनेकांना अशक्य होत आहे. वीज कर्मचारी बिल वसुलीसाठी येऊन वीज खंडित करतात. यामुळे काही वीज ग्राहक निमूटपणे वीज बिल भरत आहेत.

बॉक्स

ग्राहकांच्या तक्रारी

आम आदमी पार्टीचे रवी पुप्पलवार यांनी सांगितले की, लॉकडाऊननंतर ही परिस्थिती निर्माण झाली. मीटर रीडिंग न घेणे, सरासरी बिल पाठवणे, यामुळे आप पक्षाकडे बाबूराव आवळे, लोखंडे, अवधूत थूल, बहुरिया ठेंगरे, कुणाल सातपुते, रामदास खरतड, ठाकरे अशा अनेक वीज ग्राहकांनी वीज बिल दुप्पट आल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार आम आदमी पार्टीतर्फे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

बॉक्स

असा वाढला स्थिर व वहन आकार

स्थिर आकारात २०१७ पासून सतत वाढ होत आहे. २०१७ ला ५५ रु. होता. २०२१ ला १०२ आहे. आतापर्यंत ५० रुपयांची वाढ झाली आहे. तर वीज निर्मितीला लागणारा वहन आकार सर्वांत जास्त लावला जातो. तीन हजारांच्या बिलावर ५०० रुपयांच्या वर वहन आकार लावला जातो. या आकारामुळे व १०१ ते ३०० युनिटपर्यंत वापरासाठी सात रुपये ३४ पैसे वीज दर आकारला जातो. या लागलेल्या आकारामुळे वीज बिल दुप्पट होते व साधारण कुटुंबास बिल भरणे अवघड होते.

कोट

ग्राहकांची तक्रार आहे की वीज बिलात लावलेले इतर आकार आम्हीच लावले. म्हणून आमच्यावर ते संताप व्यक्त करतात. परंतु इतर आकार लावण्याचा अधिकार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगालाच आहे. आम्हाला नाही.

- प्रवीण तुराणकर, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, बल्लारपूर.

बॉक्स

अशी आहे तालुक्यातील ग्राहकसंख्या

वीज ग्राहक- २७, ०००.

कृषी ग्राहक- १,००७

बल्लारपूर शहर वीज ग्राहक- १७,५००

व्यापारी ग्राहक- १,२१२

लघुउद्योग वीज ग्राहक- ११८