शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर रोजगार निर्मितीचे केंद्र होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 23:42 IST

बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा, क्रीडा संकूल, डायमंड प्रशिक्षण केंद्र, एक हजार महिलांसाठी सिलाई मशीन केंद्र अशा अनेक पायाभूत सुविधा शहरात निर्माण होत आहे. या माध्यमातून बल्लारपुरातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील. बल्लारपूर हे भारतातील एक सर्वात सुंदर शहर म्हणून पुढे येतच आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : तीन हजार बेघरांना हक्काचे घर देणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा, क्रीडा संकूल, डायमंड प्रशिक्षण केंद्र, एक हजार महिलांसाठी सिलाई मशीन केंद्र अशा अनेक पायाभूत सुविधा शहरात निर्माण होत आहे. या माध्यमातून बल्लारपुरातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील. बल्लारपूर हे भारतातील एक सर्वात सुंदर शहर म्हणून पुढे येतच आहे. नजीकच्या काळात ते रोजगार निर्मितीचे मुख्य केंद्रदेखील होईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी येथे केले.बल्लारपूर शहरातील शिवाजी वार्ड, गौरक्षण वार्ड, रविंद्र नगर वार्ड, मौलाना आझाद वार्ड आदी ठिकाणच्या सात कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमीपूजन ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील विविध तीन भागांमध्ये घेतलेल्या सभांमध्ये बोलताना त्यांनी बल्लारपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या शहराने भरभरून आपल्याला दिले असल्यामुळे या शहराला रोजगार, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते व आवश्यक पायाभूत सुविधांनी भारतातील एक सुंदर शहर बनविण्याचे आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.बल्लारपूर मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील बदल आता लक्षात येण्याइतपत जाणवतो. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील एका सर्वांगसुंदर मतदारसंघाचे वैभव या बल्लारपूर मतदारसंघाला प्राप्त होईल. येथील सैनिकी शाळा देशाला भूषण ठरणारी बनत आहे. बॉटनिकल गार्डनची जोमाने तयारी सुरू आहे. मुलींची पहिली डिजिटल शाळा नगरपालिकेमार्फत या ठिकाणी निर्माण होत आहे. शहरात उत्तम बाजारपेठही आकाराला येणार आहे. याठिकाणी अद्ययावत पोलीस ठाणे, उपविभागीय कार्यालय लक्षवेधी ठरले आहे. बल्लारपूर शहरांमध्ये एकूण ९० कोटी रुपये खर्च करून २४ तास चालणाºया पाणीपुरवठा योजनेला लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र रस्ते निर्मिती आणि पाईपलाईन टाकण्याच्या कामाची सांगड घालण्यासाठी या योजनेला थोडा विलंब होत आहे. बल्लारपूरच्या प्रत्येक वार्डामध्ये नागरिकांना मिनरल वॉटरपेक्षाही शुद्ध पाणी देणारे पाण्याचे एटीएम उघडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बल्लारपूर शहरातील तीन हजार बेघरांना अद्यावत घरे देण्याचे आपले स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, बल्लारपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, सभापती रेणुका दुधे, उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विपिन मुग्धा उपस्थित होते.