बल्लारपूर वेकोलिचे क्वॉर्टर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 23:06 IST
येथील वेकोलिच्या ब्लॉक क्र. ३ मधील क्वार्टर नं. ६३/१ ची मागची बाजू शुक्रवारी अचानक कोसळली. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सुदैवाने क्वाटर्रमध्ये कुणीच नसल्यामुळे मोठी जीवित हाणी टळली.
बल्लारपूर वेकोलिचे क्वॉर्टर कोसळले
<p>लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील वेकोलिच्या ब्लॉक क्र. ३ मधील क्वार्टर नं. ६३/१ ची मागची बाजू शुक्रवारी अचानक कोसळली. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सुदैवाने क्वाटर्रमध्ये कुणीच नसल्यामुळे मोठी जीवित हाणी टळली.ब्लॉक ६३ मधील केशव सातपुते हे या क्वार्टरमध्ये राहतात. मात्र घटनेच्या दिवशी घरातील सर्व जण बाहेर होते. यापूर्वीही १३ जुलैच्या रात्री ब्लॉक ७१ मधील क्वार्टर नं.७१/१ अशाच पद्धतीने कोसळले. मायनर्स क्वाटर्सची वस्ती ही खूप जुनी असून याकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्ल्याने क्वार्टर कोसळण्याच्या घटना घडत आहेत.क्वार्टरच्या डागडुजीची मागणी कोयला श्रमिक संघाने येथील महाव्यवस्थापकांकडे वारंवार केली. मात्र अद्याप कुठल्याही प्रकारच्या दुरूस्तीचे काम करण्यात आले नाही. मायनर्स क्वाटर्स मधील ब्लॉक ५५ सोबतच इतरही ब्लॉक जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे मोठी जीवित हाणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्वाटर्सच्या दुरूस्तीचे काम त्वरीत सुरू करण्याची मागणी अलर्टनेट वेलफेअर बोर्डाचे सदस्य लोमेश लाडे व कल्याण समिती सदस्य रामचंद्र यादव यांनी केली आहे.