शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

बल्लारपुरात पाळला कडकडीत बंद

By admin | Updated: February 2, 2017 00:31 IST

बंद असलेल्या पेपर मिलच्या समस्येवर तोडगा काढून पेपर मिल पूर्ववत सुरु करणे आणि पगार तसेच बोनसची थकीत रक्कम कामगारांना द्यावी, ...

बाजारात शुकशुकाट : बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादबल्लारपूर : बंद असलेल्या पेपर मिलच्या समस्येवर तोडगा काढून पेपर मिल पूर्ववत सुरु करणे आणि पगार तसेच बोनसची थकीत रक्कम कामगारांना द्यावी, या मागणीकरिता बल्लारपूर इंडस्ट्रिज मजदूर संघाने पुकारलेल्या बल्लारपूर बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. सर्वच प्रतिष्ठाने बंद होती. बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता.पेपर मिल बंद असल्यामुळे त्याचा येथील व्यापारावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांनी बंदला समर्थन देत दुकाने बंद ठेवली. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही. पेपर मिल सुरळीत सुरु व्हावी व थकीत असलेले बोनस व पगार कामगारांना द्यावे, अशा मागणीचे निवेदन येथील एसडीओ शाहुराजे संभाजी मोरे यांना देण्यात आले. याप्रसंगी बीआयएमएसचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. शैलेश मुंजे, बल्लारपूर इंडस्ट्रिज मजदूर संघाचे महामंत्री प्रशांत बहिरम, बल्लारपूर बिझनेस असोसिएशनचे अध्यक्ष नरेश मुंधडा, सैय्यद हसन, के. शंकर, उमेश बोरकर, दीपक मिश्रा, दिलीप शर्मा, तारीक अहमद हे उपस्थित होते.मागण्यांवर १५ दिवसात सकारात्मक विचार न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश मुंजे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)