शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर पेपर मिलने लावली वैदर्भियांना फूटबॉलची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 11:52 IST

फुटबॉल खेळाने एकेकाळी विदर्भातील नागरिकांना आपलेसे केले होते. त्याचे कारण बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाची फुटबॉलमध्ये असलेली गोडी!

ठळक मुद्देआठवणींचा ठेवाअखिल भारतीय सामन्यांची ३० वर्षांची परंपरा खंडित

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : फुटबॉल खेळाने एकेकाळी विदर्भातील नागरिकांना आपलेसे केले होते. त्याचे कारण बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाची फुटबॉलमध्ये असलेली गोडी! त्यांच्या या गोडीतूनच पेपरमिल कॉलनीतील फूटबॉल मैदानावर सातत्याने ३० वर्षे अखिल भारतीय स्तरीय फूटबॉल सामने होत राहिलेत. हे सामने बघण्याकरिता केवळ पेपरमिल कॉलनीच नव्हे तर बल्लारपूर परिसरातील बामणी, विसापूर व चंद्रपुरातील फुटबॉलप्रेमी यायचे. पेपर उद्योग सुरू झाल्याच्या काही वर्षांतच पेपर मिलने क्रीडा मैदान तयार करून त्याला ‘फूटबॉल ग्राऊंड’ असे नाव दिले होते. या मैदानावर कबड्डी, हॉकी इत्यादी खेळ खेळले जात. मात्र, व्यवस्थापनाचा भर फूटबॉल खेळाकडे अधिक होता. कर्मचारी व त्यांच्या मुलांची या खेळात रूची वाढावी, चांगले खेळाडू तयार व्हावेत हा व्यवस्थापनाचा हेतू होता. याकरिता खेळाडूंना विविध सोयी पुरविल्या जात असे. यातून पेपर मिलची फूटबॉल टीम तयार झाली. या टिमने अन्य राज्यांत खेळून काही बक्षिसेही पटकाविली होती. या मैदानावर वार्षिक विशाल मेळावा आणि रावणदहन कार्यक्रम व्हायचा. मात्र या मैदानाची फूटबॉल मैदान हीच अखेरपर्यंत राहिली. नंतर व्यवस्थापनाने थापर उद्योग समूहाचे संस्थापक स्व. लाला करमचंद थापर यांच्या स्मृतीत अखिल भारतीयस्तरीय फूटबॉल सामने भरविणे सुरू केले.या सामन्यात पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, आंध्र, आसाम तसेच अन्य राज्यांतील नामवंत टीम खेळायला येऊ लागल्या. सुमारे १२-१५ दिवस चालत राहणाऱ्या सामन्यातील चमूच्या खेळांची चर्चा व्हायची. अंतिम महत्त्वाचे काही सामने कर्मचाºयांना बघता यावे याकरिता व्यवस्थापन पाळीच्या वेळामध्ये बदल करीत होती. यामुळे हे सामने बघण्याला कर्मचाऱ्यांना संधी मिळून त्यांची सामन्यात रूची वाढायची आणि अंतिम सामना कोण जिंकणार याची त्यांच्यात पैज लागायची. अंतिम दोन तीन सामने बघण्याकरिता फूटबॉल प्रेमींची या मैदानाकडे रिघ लागायची. अशी प्रचंड लोकप्रियता येथे या खेळाला मिळाली होती.फूटबॉल सामने हे एखाद्या मोठ्या पर्वासारखे क्रीडाप्रेमींना वाटायचे. काही वर्षांनी मात्र यात व्यवस्थापनाची रूची कमी होत गेली. उद्योगाच्या विस्ताराची इमारत याच फूटबॉल मैदानावर उभी करण्यात आली. ३० वर्षे सुरू असलेल्या सामन्यांची परंपरा कायमची बंद झाली. सांस्कृतिक व मनोरंजक कार्यक्रम ठप्प झाले ते कायमस्वरूपातच! आता केवळ आठवणी स्मरणात राहिल्या आहेत.

कलामंदिराला आली अवकळाबल्लारपूर पेपर मिलने कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याकरिता बीपीएम कलामंदिर संस्थेची स्थापना केली. भव्य मंच उभारून ‘कलामंदिर’ असे मोहक नाव त्या परिसराला देण्यात आले होते. कलामंदिराच्या मंचावरुन आठवड्यातून एकदा चित्रपट दाखविला जात होता. या मंचावर हिंदी-मराठी नाट्य तसेच एकांकिका स्पर्धा, कवी संमेलन, आर्केस्ट्रा, रामलिला हे कार्यक्रम व्हायचे. आता ते सारे कार्यक्रम बंद होऊन कलामंदिराला अवकळा आली आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा