शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर पहिला आरओयुक्त मतदार संघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:04 IST

बल्लारपूर विधानसभा मतदार संघ हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला आरओयुक्त मतदार संघ ठरेल यादृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. हा मतदार संघ शंभर टक्के एलपीजी गॅसयुक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धूरमुक्त गावांचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : आगरझरी व पदमापूर येथे प्रवासी बस निवाऱ्यांचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा मतदार संघ हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला आरओयुक्त मतदार संघ ठरेल यादृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. हा मतदार संघ शंभर टक्के एलपीजी गॅसयुक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धूरमुक्त गावांचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे. या मतदार संघातील १२५ गावांमध्ये आकर्षक प्रवासी निवारे बांधण्याचा संकल्प आपण केला असून पदमापूर आणि आगरझरी या गावांमध्ये पहिला प्रयोग आपण राबविला आहे. या मतदार संघातील सर्व अंगणवाड्या आय.एस.ओ. मानांकित करून त्या माध्यमातून ० ते ६ वयोगटातील बालकांना योग्य शिक्षण व संस्कार देण्याचा आपला मानस आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने आगरझरी येथे १० लाख रू. निधी खर्चून आमदार निधीतून सामाजिक सभागृह बांधण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.चंद्रपूर तालुक्यातील पदमापूर आणि आगरझरी येथे रविवारी प्रवासी निवाºयांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा नेते रामपाल सिंह, सभापती ब्रिजभूषण पाझारे, मनपाचे स्थायी समिती सभापती राहूल पावडे, जिल्हा परिषद सदस्या रोशनी खान, भाजपा तालुका अध्यक्ष हनुमान काकडे, फारूक शेख, जयंत टापरे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये आरओ मशीन बसवून त्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हा प्रयोग आता संपूर्ण मतदार संघात राबवत हा मतदार संघ देशातील पहिला आरओयुक्त मतदार संघ ठरेल, असा आपला प्रयत्न आहे. प्रत्येक घरात एलपीजी गॅस उपलब्ध व्हावा व त्या माध्यमातून हा मतदार संघ धूरमुक्त ठरावा हा आपला संकल्प आहे. सर्व अंगणवाड्या आय. एस. ओ. मानांकित करून त्या माध्यमातून बालकांना सुसंस्कारित करण्याचा आपला मानस आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. पदमापूर आणि आगरझरी या दोन गावांमध्ये आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या प्रवासी निवा-यांचे लोकार्पण यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.