शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर विधानसभा क्षेत्र धूरमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:27 IST

बल्लारपूर विधानसभा क्षेत्र राज्यात विकासात अग्रणी ठरावा. यामध्ये प्रत्येक भगिनींना डोक्याच्या विकारापासून मुक्ती मिळावी, जंगलातील सरपणावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी संपूर्ण क्षेत्र धूरमुक्त करण्याचा आपला संकल्प आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : विसापूर येथे ४८७ जणांना गॅस कनेक्शनचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्र राज्यात विकासात अग्रणी ठरावा. यामध्ये प्रत्येक भगिनींना डोक्याच्या विकारापासून मुक्ती मिळावी, जंगलातील सरपणावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी संपूर्ण क्षेत्र धूरमुक्त करण्याचा आपला संकल्प आहे. लवकरच १०० टक्के कुटुंबाना गॅस जोडणी देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.विसापूर येथे आयोजित एलपीजी गॅस कनेक्शन वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. मध्य चांदा वनविभागाच्या वतीने येथील कार्यक्रमात तब्बल ४८७ कुटुंबाना गॅस जोडणीचे वितरण केले. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, चंद्रपूर मनपाच्या अध्यक्ष अंजली घोटेकर, भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, मध्य चांदा वनविभागाचे वनसंरक्षक गजेंद्र हिरे, बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरिश गेडाम, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, जि. प. सदस्य वैशाली बुद्धलवार, पं. स. सदस्य विद्या गेडाम, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विकास अहीर, रमेश पिपरे, दिलीप खैरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी इंगळे आदींची उपस्थिती होती. दरम्यान लाभार्थी कुटुंबाना पालकमंत्र्यांच्या हस्ते गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक गजेंद्र हिरे, संचालन हेमंत शेंडे यांनी तर आभार सरपंच जिलटे यांनी मानले.विसापूर परिसराला मिळणार वैभवविकासात्मक कार्याला सातत्याने पुढे नेण्यासाठी विसापूर परिसरात बॉटनिकल गार्डन पूर्णत्वास येत आहे. सैनिक शाळाही आपल्या परिसराचे वैैभव वाढविणारी ठरणार आहे. २७ कोटी रुपये खर्चाचे तालुकास्तरीय क्रीडांगण साकारले जात असून या भागातील क्रीडापट्टूंना आॅलिम्पिक खेळासाठी संधी मिळणार असल्याचा आशावाद पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार