शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
5
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
6
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
7
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
8
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
9
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
10
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
11
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
12
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
13
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
14
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
15
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
16
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
17
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
18
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
19
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
20
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश

बल्लारपूर मतदार संघ हागणदारीमुक्त करणार

By admin | Updated: June 12, 2016 00:40 IST

हागणदारीमुक्त योजनेत बल्लारपूर हे विदर्भात प्रथम आले असून आता या पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे.

सुधीर मुनगंटीवार : बल्लारपूर क्षेत्रात ५०० कोटींची विकास कामे सुरु, ग्रीन बल्लारपूर म्हणून देशात ओळख होईलबल्लारपूर : हागणदारीमुक्त योजनेत बल्लारपूर हे विदर्भात प्रथम आले असून आता या पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. बल्लारपूर, मूल व पोंभूर्णा हे तीनही तालुके शंभर टक्के हागणदारीमुक्त करून २०१९ पर्यंत बल्लारपूर विधानसभा मतदार संघ देशातील पहिला हागणदारीमुक्त मतदार संघ करण्याचा संकल्प आपण केला आहे. यासोबतच देशातील पहिले हरित क्षेत्र म्हणून बल्लारपूरला ओळख प्राप्त करून देणार असल्याचा निर्धार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. बल्लारपूर शहरातील २४ कोटीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता डी. के. बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, तहसिलदार विकास अहीर, मुख्याधिकारी विपिन मुद्दा, सभापती देवराव भोंगळे, जि. प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, भाजपा अध्यक्ष हरीश शर्मा व अधिकारी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बल्लारपूर शहरातील प्रत्येक विकासकामाचे भूमिपूजन त्या त्या वार्डामधील पाच नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.बल्लारपूर पालिका ते कॉलरी गेट अंतर्गत रस्ताचे सिमेंट क्रांकीट रस्ता १५ कोटी ५ लाख, वन विभागाच्या जंगलाला व पेपर मिलच्या टाकाऊ डेपोपासून ते कारवा जुनोना रस्त्याला जोडणाऱ्या समतल चराच्या कडेने संरक्षण भिंतीचे बांधकाम चार कोटी एक लाख ४० हजार व बल्लारपूर शहरातील कुळमेथे लेआउट, चापशी जोशी लेआउट, मोगरे लेआउट, मोरे लेआउट, विद्यानगर लेआउट व सुचकनगर लेआउटमधील मोकळ्या जागेचा विकास चार कोटी ७७ लाख १७ हजार असे एकूण २३ कोटी ८३ लाख ५७ हजार रुपये खर्चाच्या विकासकामांचा यात समावेश आहे. मोकळ्या जागेचा विकास करताना संरक्षण भिंत बांधणे, पदपाथ, योगाशेड, बगीचा विकास व ओटा बांधकाम करण्यात येणार आहे.यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, आपण निवडून आलो, तेव्हा बल्लारपूर शहराच्या विकासासाठी शंभर कोटी रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त निधीची कामे आता सुरु आहेत. सैनिकी शाळा २५० कोटी, बॉटनिकल गार्डन १०० कोटी, रस्त्यासाठी ५० कोटी, क्रीडा संकुल २२ कोटी, अत्याधुनिक पोलीस स्टेशन १० कोटी, उपविभागीय कार्यालय तीन कोटी ५० लाख, प्रस्तावित पाणी पुरवठा योजना ४० कोटी, मोकळ्या जागेचा विकास २४ कोटी, अत्याधुनिक बसस्थानकासाठी ५ कोटी, स्मशानभूमी विकास ५ कोटी, अशी ४५० ते ५०० कोटीची कामे या क्षेत्रात सुरु आहेत. शहरात भव्य असे मार्केट उभारण्यात येईल, असेही ते म्हणाले. मागेल त्याला पाणी या धोरणानुसार बल्लारपूर शाहरासाठी ४० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना बनविण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बलारपूरच्या सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी शहरात भव्य नाट्यगृह उभारण्यात येत असून येत्या सहा महिन्यात नाट्यगृहाचे उदघाटन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्व विकासकामे उत्कृष्ट दर्जाची करण्याचे निर्देश आपण दिल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)