आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : औद्योगिकीकरणामुळे बल्लारपूर शहराला जागतिक ओळख मिळाली आहे. विकासातही शहर स्मार्ट होण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे भरीव योगदान मिळत आहे. उपलब्ध निधीतून अंतर्गत रस्ते, दलित वस्ती सुधारणा, स्वच्छ भारत अभियान व अन्य प्राप्त निधीच्या माध्यमातून बल्लारपूर शहराला विकासात स्मार्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.बल्लारपूर शहरात नगरोत्थान योजना, जिल्हास्तर योजना, अग्निशमन अभियान, नागरी दलित वस्ती योजना कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी चंदनसिंह चंदेल बोलत होते. दरम्यान ज्या प्रभागात कामाचा शुभारंभ करण्यात आला, तेथील जेष्ठ नागरिकांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, काशिनाथ सिंह, वैशाली जोशी, सभापती जयश्री मोहुर्ले, पुनम मोडक, नगरसेवक आशा संगीडवार, सारिका कनकम, स्वामी रायबरम, कांता ढोके, विकास दुपारे यांची उपस्थिती होती.यावेळी चंदेल म्हणाले, राजकीय जीवनाच्या वाटचालीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विकासात्मक दृष्टीकोन बाळगला आहे. यामुळेच शहराच्या विकासात गती आली आहे. जिल्ह्यातील दुसºया क्रमांकाचे शहर स्मार्ट होण्याकडे वाटचाल करीत आहे. सबका साथ, सबका विकास, हेच ध्येय त्यांनी जोपासले आहे. आगामी काळात बल्लारपूर शहराचा अंतर्गत चेहरा मोहरा बदललेला दिसणार, असे सांगितले.
बल्लारपूर शहराला स्मार्ट करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:24 IST
औद्योगिकीकरणामुळे बल्लारपूर शहराला जागतिक ओळख मिळाली आहे. विकासातही शहर स्मार्ट होण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे भरीव योगदान मिळत आहे.
बल्लारपूर शहराला स्मार्ट करणार
ठळक मुद्देचंदनसिंह चंदेल : पालकमंत्र्यांचे शहरासाठी भरीव योगदान