शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

झाडीबोली साहित्य मंडळाच्या बल्लारपूर शाखेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 22:55 IST

झाडीबोली साहित्य मंडळाची शाखा बल्लारपूर येथे उघडण्यात आली. या शाखेचे उद्घाटन व त्याप्रसंगी बहारदार कवी संमेलन नुकतेच पार पडले.

आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : झाडीबोली साहित्य मंडळाची शाखा बल्लारपूर येथे उघडण्यात आली. या शाखेचे उद्घाटन व त्याप्रसंगी बहारदार कवी संमेलन नुकतेच पार पडले.येथील कला वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंडोपत बोढेकर होते. उद्घाटक म्हणून ना. गो. थुटे तर प्रमुख अतिथी म्हणून कला वाणिज्य महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे, ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, मराठी शाखा प्रमुख प्रा. डॉ. रवी केवट उपस्थित होते. थुटे यांनी स्वलिखित पुस्तकांचा एक संच महाविद्यालयाला भेट स्वरूपात दिला.झाडीबोली व झाडीपट्टीतील संस्कृती व त्यावर होत असलेले लिखाण यावर थुटे यांनी प्रकाश टाकले. अध्यक्षीय भाषणात बोढेकर यांनी, बोलीवर संस्कार होऊन भाषा तयार झाली आहे. बोली ही माता तर भाषा ही कन्या होय, अशा शब्दात झाडीबोली भाषेचे महत्त्व विषद करुन झाडीबोली संमेलनाचे कारण काय यावर मार्गदर्शन केले. प्राचार्य शिंदे, वसंत खेडेकर, प्रा. केवट यांचीही भाषणे झालीत.याप्रसंगी झालेल्या कवी संमेलनात खुशालदास कामडी, सु. वि. साठे, प्रियंका वाढई, अनिता कन्नाके, शितल पोहाणे, राजेश नगराळे, प्रा. स्वप्नील बोबडे, सुजिता पोहाणे, सुनील इखारे, प्राचार्य अर्चना ताजने, प्रा. खुशबू जोसेफ यांनी आपल्या कविता ऐकविल्या. संचालन प्रा. श्रावण बानासूरे यांनी केले.यावेळी बल्लारपुरातील झाडीबोली साहित्य मंडळाची कार्यकारिणी गठित करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून प्राचार्य अनिल शिंदे, अध्यक्ष म्हणून प्रा. श्रावण बानासूरे, उपाध्यक्ष प्रा. खुशबू जोसेफ, सचिव प्रा. अर्चना ताजने यांची तर सदस्य म्हणून प्रा. स्वप्नील बोबडे, प्रियंका वाढई, शितल पोहाणे, अनिता कन्नाके यांची निवड करण्यात आली.