शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा आज उभारणार नवचैतन्याची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:18 IST

प्रकाश काळे ।आॅनलाईन लोकमतगोवरी : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष. प्रत्येकाच्या घरी सुखसमृद्धी नांदावी, ही मनोकामना व्यक्त करण्याचा सोहळा. शेतकऱ्यांचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. दरवर्षी शेतकऱ्यांच्या पाठीमागे संकटाचा फेरा असतो. यंदाही आहे. त्यामुळे दिवस बदलतील, या आशेने नवे स्वप्न डोळ्यात साठवून नवचैतन्याची गुढी उभारण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.यावर्षी शेतकरी अस्मानी ...

ठळक मुद्देविकासाची आस : अन्यायकारक धोरणांनी शेतकरी हतबल

प्रकाश काळे ।आॅनलाईन लोकमतगोवरी : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष. प्रत्येकाच्या घरी सुखसमृद्धी नांदावी, ही मनोकामना व्यक्त करण्याचा सोहळा. शेतकऱ्यांचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. दरवर्षी शेतकऱ्यांच्या पाठीमागे संकटाचा फेरा असतो. यंदाही आहे. त्यामुळे दिवस बदलतील, या आशेने नवे स्वप्न डोळ्यात साठवून नवचैतन्याची गुढी उभारण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.यावर्षी शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाने भरडून निघाला आहे. शेतकºयांनी डोळा भरून पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा होत आहे. अवकाळी गारपीट व पावसाने खरीप तसेच रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाली. हाती येणारा शेतमाल वाया गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला आहे. गुढीपाडव्याला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असायचे. परंतु, ते दिवस आता संपण्याच्या मार्गावर आले आहेत. विविध प्रश्नांनी अस्वस्थ झाल्याने त्यांच्या चेहºयावर आनंद दिसत नाही. गुढीपाडव्याला शेतकरी समाधानी असायचा. पण, सरकारच्या अन्यायकारक धोरणांमुळे बळीराजा मनातून पूर्णत: खचला.गुढीपाडव्याला घरी पुरणपोळी करून सालगडीला जेवण घातले जाते. ही परंपरा आजही कायम असली तरी चेहऱ्यावरचे दु:खी भाव लपविता येत नाही.सालगडी ठेवण्याचे प्रमाण घटलेगुढी पाडव्याच्या दिवशी शेतकरी नवीन सालगडी ठेवण्याची परंपरा होती.मात्र, दिवसेंदिवस शेती बिनभरवशाची होत आहे. पुरेसे उत्पादन होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. उत्पन्नच होत नसल्याने सालगड्याचा खर्च झेपत नाही. त्यामुळे शेतकरी सालगडी ठेवण्याचा करार या दिवशी करण्याचे प्रमाण आता घटत आहे. बरेच शेतकरी नाईलाजाने इतरांना ठेक्याने देतात. यातून गरीबी व शोषणाची मालिका सुरूच राहते.