शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निराधाराच्या पैशानेच बालाजीचा घात

By admin | Updated: May 16, 2017 00:35 IST

राज्यभरात बळीराजा आत्महत्या करीत असला तरी सरकारला मात्र अद्यापही पाझर फूटत असल्याचे जाणवत नाही.

पैसे मिळालेच नाही : कर्जबाजारी शेतकरी बालाजी गुटे यांनी संपविली जीवनयात्रा संघरक्षित तावाडे। लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : राज्यभरात बळीराजा आत्महत्या करीत असला तरी सरकारला मात्र अद्यापही पाझर फूटत असल्याचे जाणवत नाही. उलट त्यांचे कर्ज माफ करण्याऐवजी खिल्ली उडविली जात आहे. शेतकरी आत्महत्येला जसे कर्ज कारणीभूत आहे, तसेच प्रशासकीय यंत्रणाही कारणीभूत ठरत असल्याचे बालाजी गुटे या शेतकऱ्यांवर घडलेल्या प्रसंगावरून दिसून येते. दोन दिवसापूर्वी म्हणजे १३ मे रोजी जिवती तालुक्यातील पुडियाल मोहदा येथील कर्जबाजारी शेतकरी बालाजी गुटे (६९) यांनी आपल्याच शेतात झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दुष्काळ आणि सततच्या नापिकीने जीवन कसे जगावे, कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, या विवंचनेत सापडलेल्या बालाजी गुंटे या वृध्द शेतकऱ्याने एकदाचे जीवनच संपविले.आत्महत्यापूर्वी ते काही दिवसांपासून आपल्या निराधाराच्या पैशासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ये-जा करीत होते. महिन्याकाठी ६०० रुपये याप्रमाणे बालाजी गुटे यांना निराधाराचे पैसे मिळायचे. ६०० रुपये म्हणजे निराधाराला जगण्यासाठी आधारच असतो. पण यावेळेला मात्र बँकेत आपल्या निराधाराच्या पैशासाठी येरझाऱ्या मारता- मारता बालाजी थकून गेले होते, असे गावकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर समजले. कदाचित अगोदरच कर्जाने थकलेल्या त्या गरीब शेतकऱ्याचे नियोजनच बिघडले असावे आणि निराशेपोटी त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज जनतेकडून आणि घरच्यांकडून वर्तविला जात आहे. लोकमतने वेधले होते लक्ष१३ मे रोजी लोकमतने बँकेतील निराधारांची गर्दी पाहता आणि दिवसभर बँकेत बसूनही त्यांना पैसे मिळत नसल्याने निराधारांना आधारच नाही, या आशयाचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्याचदिवशी बालाजी गुंटे यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. जिवती हे तालुक्याचे ठिकाण असले तरी येथे एकही राष्ट्रीयकृत बँक नाही. वैनगंगा- कोकण ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा दोन बँका असून येथेही पुरेशी रक्कम राहत नाही. याबाबतही लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित करून यंत्रणेचे लक्ष वेधले. प्रशासन मात्र दुर्लक्षच करीत आहे. असेच जर नेहमी राहले तर आणखी अनुचित घटना घडण्यास कोणीच रोखू शकणार नाही,निराधारांना वेळीच पैसे द्यावे -महेश देवकतेपुडियाला मोहदा येथील बाजाली गुंटे यांनी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केली. तसेच निराधाराच्या पैशासाठी गुंटे यांनी भरलेला बँकेचा विड्राल (दि. १२ मे रोजी), निराधाराचे न मिळालेले पैसे हा सर्व प्रकार सांत्वनासाठी गेलेल्या पं.स. उपसभापती महेश देवकते यांच्या निदर्शनात आणून दिला. यापुढे बँकांनी शेतकरी असोत की निराधार व्यक्ती असो, यांना वेळीचे पैसे द्यावे, बँकेत गरीब निराधारांची गर्दी दिसणार नाही. बँकेत नेहमी रक्कम असायलाच हवी. जेणेकरुन सर्वांना पैसे मिळायला हवे, अशी मागणी देवकते यांनी संबंधित यंत्रणेकडे केली. ग्रामीण बँकेत निराधार लोकांकडे नेहमी दुर्लक्ष दिसत असून यानंतर हा प्रकार सहन केला जाणर नाही, असेही त्यांनी सांगितले.