शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गोवरीतील बालाजी बोढे दीड महिन्यांपासून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:51 IST

बहीण-भावाच्या नात्याला मानवतेचा स्पर्श आहे़ जिव्हाळा, आपुलकीने एकमेकांच्या सुख-दु:खात समर्पण होण्याची ही माया मानवी जीवनाला मिळालेले वरदान आहे़ मात्र,

ठळक मुद्देबहिणीला ओवाळणीची प्रतीक्षा : बेपत्ता झालेला भाऊ अद्याप परतलाच नाही

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी: बहीण-भावाच्या नात्याला मानवतेचा स्पर्श आहे़ जिव्हाळा, आपुलकीने एकमेकांच्या सुख-दु:खात समर्पण होण्याची ही माया मानवी जीवनाला मिळालेले वरदान आहे़ मात्र, बेपत्ता झालेल्या भावाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे तक्रार करूनही निराशा वाट्याला आलेली गोवरी येथील एक बहिण भावाची आजही प्रतीक्षा करीत आहे़राजुरा तालुक्यातील गोवरी येथील बालाजी बोढे (५७) हे राजुरा शहरात जातो, असे सांगून दीड महिन्यांपूर्वी घराबाहेर निघाले़ परंतु, ते घरी परतलेच नाही़ कुटुंबीयांनी सर्व नातेवाईक आणि जिल्ह्यातील अनेक गावांत शोध घेतला़ परंतु अजूनही शोध न लागल्याने संपूर्ण कुटुंब अजूनही चिंतेत आहे. मुलांनी वडील हरविल्याची तक्रार राजूरा पोलिसांत दाखल केली़ या घटनेला दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला. परंतु शोध लागला नाही. भावाच्या जिवासाठी बहिणीनेही आटापिटा सुरु केला. पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा करूनही निराशा वाट्याला आली आहे़ ,आपला भाऊ भाऊबिजेला तरी घरी परत येईल, या एकाच आशेवर बहिण कांताबाई भावाची वाट पाहत आहे. भाऊबिज जवळ आल्याचे पाहून तिने पोलीस ठाणे गाठले़ भावाचा शोध कुठपर्यंत आला, अशी विचारणा केली़ तक्रार करूनही योग्यरितीने तपास का झाला नाही, असे प्रश्न उपस्थित केले़ परंतु, पोलीस प्रशासनाने मनाने घेतले नाही़ त्यामुळे आज भाऊबिज हा सण असूनही ओळवणी कुणाला करावी, असा प्रश्न कांताबाईने व्यवस्थेला विचारला आहे़ भाऊबिज हा बहिण - भावाच्या, आनंदाचा क्षण असताना आपला भाऊच घरी नसल्याचे दु:ख कांताबाईला आहे.आपला भाऊ लवकर परत यावा यासाठी कांताबाई मनोमन पोलीस व प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे़रविवारी गोवारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशनगडचिरोली : गोवारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन सांस्कृतिक मंगल कार्यालय आरमोरी मार्ग गडचिरोली येथे रविवारी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे उपस्थित राहणार आहेत.