शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बालाजीभक्तांनी फुलली क्रांती नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:45 IST

रविवारी रातघोडयापासून घोडा रथ यात्रेला प्रारंभ झाला. रात घोडयाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभागी होत चिमूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या बालाजी महाराजांचे दर्शन घेतले.

ठळक मुद्दे‘गोविंदा गोविंदा’चा गजर : अबालवृद्ध, युवकांच्या उपस्थितीत गोपाल काला

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : रविवारी रातघोडयापासून घोडा रथ यात्रेला प्रारंभ झाला. रात घोडयाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभागी होत चिमूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या बालाजी महाराजांचे दर्शन घेतले. आज बुधवारी दुपारी १२ ते ३ वाजता घोडा रथयात्रेचा गोपाल काला हजारो अबालवृद्ध, युवकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ‘गोविंदा, गोविंदाच्या गजराने क्रांतीनगरी दूमदुमून गेली होती. पंचक्रोषीतील हजारो बालाजी भक्ताच्या उपस्थितीने क्रांती नगरी फुलली होती.पेशवाईच्या काळात जीर्णाद्वार झालेल्या या बालाजी मंदिराला ३९२ वर्षांचा इतिहास आहे. मंदिराची वास्तू भोसलेकालीन आहे. चिमूर येथील घोडा रथ यात्रेला २४६ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. आजही तेवढयाच उत्साहात यात्रेत गावागावातील बालाजी भक्त दर्शन घेण्यास मोठया संख्येने गर्दी करतात.बुधवारी बालाजी महाराजाच्या घोडा रथयात्रेच्या नवरात्र समाप्तीला गोपाल काल्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता आज सकाळपासूनच बालाजी भक्तांचे आगमन बालाजी मंदिर परिसरात होण्यास सुरूवात झाली. दुपारी २ वाजतापर्यंत पूर्ण परिसर बालाजी भक्तांनी फुलून गेला होता. खोडे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर गोपाल काला करण्यात आला. यावेळी मंदिराचे अध्यक्ष निलम राचलवार, अ‍ॅड.चंद्रकांत भोपे, डाहुले, भलमे, डॉ. दीपक यावले आदी उपस्थित होते. महाशिवरात्रीपर्यंत चालणाऱ्या घोडा रथयात्रेमध्ये बालाजी मंदिराच्या आवारात माजी आमदार मितेष भांगडिया, आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या वतीने गुजरात येथील लक्ष्मीनारायण मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे.ही प्रतिकृती बालाजी भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. यात्रेदरम्यान चिमूर नगरीत मनोरजंनाच्या साधनासह, मौत का कुआ, आकाश पाळणे, मिनी सर्कस यात्रेकरूंचे लक्ष वेधत आहे.पोलिसांचा चोख बंदोबस्तबुधवारी गोपालकाल्यानिमित्त हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नगरपालिकेने भक्तासाठी विविध सोई पुरवल्या आहेत. दोन ठिकाणी पोलिसांनी मदत केंद्र उभारले आहे.