शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

घोडा रथयात्रेच्या मिरवणुकीने भारावले बालाजीभक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:35 IST

३९२ वर्षांची परंपरा असलेल्या क्रांती नगरीतील घोडा रथ यात्रेला १० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्षात रविवारी रातघोडयापासून घोडा रथ यात्रेला प्रारंभ झाला. रात घोडयाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभागी होत चिमूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या बालाजी महाराजांचे दर्शन घेतले.

ठळक मुद्देहजारो भाविकांनी घेतले दर्शन : गोविंदा-गोविंदाच्या गजराने दुमदुमली क्रांतीनगरी

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ३९२ वर्षांची परंपरा असलेल्या क्रांती नगरीतील घोडा रथ यात्रेला १० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्षात रविवारी रातघोडयापासून घोडा रथ यात्रेला प्रारंभ झाला. रात घोडयाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभागी होत चिमूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या बालाजी महाराजांचे दर्शन घेतले.पेशवाईच्या काळात जीर्णोद्वार झालेल्या या बालाजी मंदिराला ३९२ वर्षांचा इतिहास आहे. मंदिराची वास्तू भोसलेकालीन आहे. चिमूर येथील घोडा रथ यात्रेला २४६ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. आजही तेवढयाच उत्साहात यात्रेत गावागावातील बालाजी भक्त दर्शन घेण्यास मोठया संख्येने गर्दी करतात.रविवारी रात घोडयाच्या मिरवणुकीत यावर्षी प्रथमच पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती होती. सोबत माजी आमदार मितेश भांगडीया, आमदार कीर्तीकुमार भांगडियाही उपस्थित होते. मिरवणुकीपूर्वी विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. रात्री १२ वाजता भक्तीमय वातावरणात फटाक्याच्या आतषबाजीने मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. ही मिरवणूक बालाजी मंदिर ते नेहरू चौक, अंहिसा चौक, बाजार ओळ, शिवाजी चौक, शहीद बालाजी रायपूरकर चौक, अशी फिरत सकाळी ५.३० वाजता बालाजी मंदिरात विसर्जित झाली. या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील हजारो बालाजीभक्त मोठ्या उसाहात सहभागी झाले होते. भक्ती संगीताच्या तालावर बालाजी भक्तांची पावले थिरकत होती. गोविंदा-गोविंदाचा गजर सातत्याने सुरू होता. महाशिवरात्रीपर्यंत चालणाऱ्या यायात्रेचे यावर्षीचे विशेष आकर्षण बालाजी मंदिराच्या आवारातील दिल्ली येथील लक्ष्मीनारायण मंदिराची प्रतिकृती आहे. ही प्रतिकृती बालाजी भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. यात्रेदरम्यान चिमूरनगरीत मनोरजंनाच्या साधनांसह, मौत का कुआ, आकाश पाळणे, अशा अनेक प्रकारच्या दुकानासह मिनी सर्कस यात्रेकरूंचे लक्ष वेधत आहे. पालिका व श्रीहरी बालाजी देवस्थान कमिटी यांनी भक्तासाठी विविधसोई पुरवल्या आहेत.बालाजी भक्तनिवासासाठी १५ कोटी देणार -जयकुमार रावलविदर्भाचा तिरूपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिमूर बालाजी महाराजांच्या यात्रेत प्रथमच राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थिती दर्शवून बालाजीचे दर्शन घेत विकास कामाची पाहणी केली व बालाजी महाराज भक्त निवासासाठी १५ कोटी निधी देण्याची घोषणा केली. दरम्यान राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी श्रीहरी बालाजी देवस्थानची वेबसाइट व गुगल अ‍ॅपचे उदघाटन केले तर देवस्थान कमिटीच्या वतीने ना. जयकुमार रावल, व आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार मितेश भांगडिया, भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, वसंत वारजूकर, डॉ. दिलीप शिवरकर, विनोद अढाल, बालाजी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष निलम राचलवार, मंगेश भलमे, बबनराव बोथले उपस्थित होते.