शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याच्या बांधकामात निकृष्ट रेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:08 IST

तालुक्यातील निमणी गावाजवळील बारमाही वाहणाऱ्या माल टोकणी नाल्यावरील सिमेंट प्लग बंधाºयाच्या बांधकामात कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाच्या चोरीच्या रेतीचा वापर केला असल्याने याबाबत व्हॉटस्अ‍ॅपद्वारे तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मोका पंचनामा केला असून कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनापरवाना खनिज रेतीचा साठा आढळून आला आहे.

ठळक मुद्देदर्जा सुमार : व्हॉटस्अ‍ॅपद्वारे तहसीलदारांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील निमणी गावाजवळील बारमाही वाहणाऱ्या माल टोकणी नाल्यावरील सिमेंट प्लग बंधाºयाच्या बांधकामात कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाच्या चोरीच्या रेतीचा वापर केला असल्याने याबाबत व्हॉटस्अ‍ॅपद्वारे तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मोका पंचनामा केला असून कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनापरवाना खनिज रेतीचा साठा आढळून आला आहे.निमनी-हिरापूर मार्गावर बारमाही वाहणाºया माल टोकणी नाल्यावर जवळपास २७ लाख रुपये खर्चून सिमेंट प्लग बंधारा बनविण्याचे काम सुरू आहे. बंधाºयाच्या कामात पवनी नाल्याची मातीमिश्रीत निकृष्ट दर्जाची पांढरी रेती चोरीने आणून कंत्राटदार वापरत असल्याची विश्वसनीय माहिती होती. सामाजिक कार्यकर्ते अभय मुनोत यांनी कामाच्या ठिकाणी पडून असलेल्या १५ ते १६ ब्रास रेतीचे फोटो घेऊन तहसीलदार कोरपना यांच्याकडे व्हॉट्सअपद्वारे तक्रार करण्यात आली. तक्रारीनंतर बुधवारी मंडळ अधिकारी, गडचांदूर व तलाठी यांनी बंधाºयाच्या कामाला भेट देऊन मोका चौकशी केली. यावेळी त्यांना १० ते ११ ब्रास रेती त्याठिकाणी साठवलेली आढळली. प्रकरणात चौकशी अधिकाऱ्यांनी पंचनामा करून अहवाल तहसीलदारांकडे पाठविल्याची माहिती आहे. नव्याने रुजू झालेले तहसीलदार मोरे यांच्याकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परिसरातील अनेक सरकारी कामात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात विनापरवाना खनिज संपत्तीचा वापर कंत्राटदार करीत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. निकृष्ट दर्जाची मातीमिश्रीत रेती असल्याने सिमेंट काँक्रिटीकरणाची गुणवत्ता ढाळसली जात आहे. बांधकाम अभियंत्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर होत नाही ना, असा सवाल अभय मुनोत यांनी केला. सदर कंत्राटदारावर कारवाईची मागणी तक्रारदाराने केलेली आहे.