शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाबुराव मडावी यांचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST

पोंभूर्णा : शात, संयमी, प्रामाणिक, नम्र आणि अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोंभुर्णा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाबुराव मडावी यांचा नावलौकिक ...

पोंभूर्णा : शात, संयमी, प्रामाणिक, नम्र आणि अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोंभुर्णा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाबुराव मडावी यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या या गुणांमुळेच ते तालुक्यातील सर्व शिक्षकांचे आवडते आणि सर्वांना हवेहवेसे अधिकारी असल्याचे गौरवोद्गार पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम यांनी काढले.

पोंभुर्णा पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी बाबुराव मडावी यांच्या स्थानांतरानिमित्त पोंभुर्णा पंचायत समिती कार्यालयामार्फत आयोजित निरोप समारंभाच्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.

यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती ज्योती बुरांडे, सदस्य तथा माजी सभापती विनोद देशमुख, सदस्य गंगाधर मडावी, संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे, सहाय्यक बी.डी.ओ. सुनिता मरसकोल्हे, सत्कारमूर्ती बाबुराव मडावी, शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप सोनपुरे, शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य जे.डी. पोटे आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी बाबुराव मडावी यांचा पंचायत समिती कर्मचारी, पदाधिकारी, तसेच शिक्षक संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सभापती विनोद देशमुख यांनी बाबुराव मडावी यांच्या कार्याचे कौतुक केले.यावेळी सत्काराला उत्तर देताना मडावी यांनी तालुक्यातील वेगवेगळे अनुभव सांगितले. सर्व शिक्षक व अधिकाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक संघटनेच्या वतीने अभय कासनगोटुवार यांनी मत व्यक्त केले. प्रास्ताविक संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे, संचालन लक्ष्मण सोनुले, आभार केंद्रप्रमुख विनायक औतकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख रोहणकर, कुंभरे व पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.