शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मदतीसाठी धावणाऱ्या मुलाच्या उपचारासाठी बापाची धडपड

By admin | Updated: July 8, 2016 00:50 IST

विजेचा धक्का लागलेल्या एका इसमाला वाचविण्यासाठी गेलेला मुलगाच गंभीररीत्या जखमी झाला.

मदतीसाठी याचना : शाळेनेही केली आर्थिक मदतघनश्याम नवघडे  नागभीडविजेचा धक्का लागलेल्या एका इसमाला वाचविण्यासाठी गेलेला मुलगाच गंभीररीत्या जखमी झाला. मुलाच्या उपचारासाठी त्याच्या वडिलांनी शेती विकली. पण एवढ्याने भागले नाही. आता ते मदतीसाठी दारोदार भटकत आहे. मुलगा बरा व्हावा, याच एकमेव आशेने नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील एका बापावर हा दुदैवी प्रसंग ओढवला आहे.रवींद्र गावतुरे हे त्या दुदैवी बापाचे नाव. शेती केवळ अर्धा एकर. तीसुद्धा असून नसल्यासारखी. रोज मजुरी करणे व आपला प्रपंच चालविणे हे त्याचे काम. रवींद्रला दोन मुले असून दोन्ही मुले तळोधी येथील लोक विद्यालयात शिकत आहेत. रवींद्रचा प्रपंच सुरळीत सुरु असताना त्याच्यावर एक भयानक आपत्ती कोसळली. रवींद्रच्या घराशेजारी एका घराचे बांधकाम सुरू होते. तिथे त्यांचा मोठा मुलगा भावेश हा खेळत होता. याचवेळी काम करणाऱ्या व्यक्तीला विजेचा धक्का लागला. या धक्क्याने तो ओरडला. या आवाजाने बाजूला खेळत असलेला भावेश मदतीला धावला. विद्युत तारेपासून त्याला वेगळे करण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र या प्रयत्नात भावेशलाच विद्युत तारेने आपल्या जाळ्यात ओढले. यात भावेश चांगलाच जखमी झाला. त्याला लगेच ब्रह्मपुरीस हलविण्यात आले. त्याची अवस्था लक्षात घेऊन ब्रह्मपुरीतील एक- दोन नामांकित रुग्णालयांनी त्यास भरती करुन घेण्यास नकार दिला. पण एका डॉक्टरांनी हिंमत दाखवली व भरती करुन घेतले. आता भावेशवर त्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या उपचारावर आतापर्यंत एक लाख रूपये खर्च झाले आहेत. पैसे आणायचे कोठून म्हणून भावेशच्या वडीलांनी वडिलोपार्जित वाट्याला आलेली जमीन विक्रीस काढली. ती विकली, पण एवढ्यानेही भागले नाही. आता तो मदतीची याचना करीत आहे. आणखी ५० ते ६० हजारांचा खर्च अपेक्षित असून एवढी रक्कम आणायची कुठून या विचाराने रवींद्र भांबावून गेला आहे.त्याची ही अवस्था पाहून तळोधी पत्रकार संघाचे सचिव संजय अगडे, सुनिल गौरकर, बल्लू गेटकर पुढे आले. रवींद्रला हिंमत दिली व अनेकांना मदतीची विनंती केली. भावेशची अवस्था लक्षात घेवून भावेशची शाळाही पुढे आली. शाळेने तीन- साडेतीन हजाराची मदत दिली. डॉ. सतिश वारजूकर यांनीही पाच हजार रुपये दिले. ही मदत अशीच सुरु राहिली तर रवींद्रची याचना निश्चित फलद्रूप होईल.