शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बाबा आमटे व साधनाताई आमटे पुरस्कार वितरण उद्या

By admin | Updated: January 7, 2017 00:45 IST

दरवर्षी दिला जाणारा बाबा आमटे मानवता पुरस्कार आसाममधील बोडोलँड येथील द अ‍ॅन्ट संस्थेचे संस्थापक डॉ. सुनील कौल ...

विजय भटकर यांची उपस्तिथी वरोरा : दरवर्षी दिला जाणारा बाबा आमटे मानवता पुरस्कार आसाममधील बोडोलँड येथील द अ‍ॅन्ट संस्थेचे संस्थापक डॉ. सुनील कौल आणि स्व. साधनाताई आमटे समिधा पुरस्कार जेनिफर लियाँग यांना जाहीर झाला असून वरोरा येथे ८ जानेवारी रोजी परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.बाबा आमटे मानवता पुरस्कार व स्व. साधनाताई आमटे समीधा पुरस्कार गोवा स्वातंत्र्यसंग्राम सैनिक श्रीधरराव पद्मावार भद्रावती व गिरीश पद्मावार प्रायोजीत विद्यार्थी सहायक समिती, वरोराच्या वतीने देण्यात येतो. यापूर्वी हा पुरस्कार कोलकताचे मामून अख्तर, सातारा येथील अविनाश पोळ, महाराष्ट्र भूषण अभय बंग, पोपटराव पवार, सुनंदा पटवर्धन आदींना देण्यात आला आहे. आसाम राज्यातील द अ‍ॅन्ट या संस्थेचे संस्थापक डॉ. सुनील कौल व जनिफर लियॉग हे दहशतवाद प्राबल्य असलेल्या जंगलव्याप्त अतिदुर्गम भागात उच्च विद्याविभूषित असूनही मागील १६ वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांना पुरस्कार ८ जानेवारीला दुपारी ३.३० वाजता ज्ञानदा जीवन विकास केंद्र परिसर, आनंदवन चौक, वरोरा प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हरीश वरभे राहतील. पुरस्कारामध्ये प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानपत्र व स्मृतिचिन्हाचा समावेश आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यार्थी सहायक समिती वरोराचे संस्थापक सचिव व अध्यक्ष प्रा. मधुकर उपलेंचवार यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)