शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आझाद बागेच्या निविदेत घोळ

By admin | Updated: July 30, 2016 01:38 IST

चंद्रपूर महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या आझाद बागेच्या निविदेमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ

प्रधान सचिवांकडे तक्रार : नागरकरांचा पत्रपरिषदेत आरोप चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या आझाद बागेच्या निविदेमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी सभापती व नगरसेवक नंदू नागरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. या निविदा प्रक्रियेत कमी रकमेच्या कंत्राटदाराला डावलून जादा रकमेच्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. या संदर्भात नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार करण्यात आल्याची माहितीही नागरकर यांनी दिली. यावेळी नागरकरांनी सांगितले की मनपाने बगिचा विकसित करण्यासाठी सुरुवातीला सहा कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. तत्कालीन आयुक्त सुधीर शंभरकर यांनी नंतर अंदाजपत्रकात उपाययोजनांचा समावेश केला. सुधारणेनंतर तीन कोटींनी कमी अंदाजपत्रकावर निविदा मागविण्यात आल्या होत्या. नंतर या निविदा रद्द केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निविदा मागविताना बगिचा विकसित करणे, पाच वर्ष देखभाल दुरुस्ती आणि दोन वर्ष डिफ्लेक्ट लॉयबिलीटी पिरीयड असे ठरविण्यात आले. यासाठी मे. खळतकर कंन्स्ट्रक्शन नागपूर, मे. विजय आर. घाटे इंजिनिअर कॉन्ट्रक्टर चंद्रपूर, मे. प्रशांत कॉन्ट्रक्टर कंपनी नागपूर यांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. यातील कमी दराच्या निविदा मंजूर करण्याच्या सूचना स्थायी समितीला करण्यात आल्या. आलेल्या निविदांपैकी मे. प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनी, नागपूर यांची निविदा कमी दराची होती. असे असतानाही ही निविदा डावलून विजय आर. घाटे यांची जादा दराची निविदा मंजूर करण्यात आल्याचा आरोप नंदू नागरकर यांनी केला आहे. या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत नागरकर यांनी या संदर्भात नगरविकास मंत्रालयातील प्रधान सचिवांकडे लेखी तक्रार केली आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याही लक्षात हा प्रकार आणून दिला. त्यानंतर नगर विकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसेकर यांनी नागपूर विभागीय आयुक्तांना याबाबत चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे, अशी माहितीही नंदू नागरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.