शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

स्वच्छतेसाठी पुरस्कारप्राप्त गावांमध्येच अस्वच्छतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 01:21 IST

स्थानिक प्रत्येक नागरिकांचे आरोग्य सदृढ राहावे तसेच पर्यावरणाचा समतोल साधला जावा यासाठी संपूर्ण

निर्मलग्राम अभियानाचा बोजवारा : शासनाच्या निधीला हरताड, पोंभुर्णा तालुक्यातील विदारक चित्र पोंभूर्णा : स्थानिक प्रत्येक नागरिकांचे आरोग्य सदृढ राहावे तसेच पर्यावरणाचा समतोल साधला जावा यासाठी संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियान, भारत स्वच्छ मिशन अभियान सुरू करण्यात आले आहे. यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचे पुरस्कारही देण्यात आले. मात्र पोंभूर्णा तालुक्यातील पुरस्कार प्राप्त गावामध्येच मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीला हरताळ फासल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाच्या योजने अंतर्गत अनेक गावात स्वच्छता करून, घरोघरी शौचालय बांधण्यास लावणे, त्याचा नियमित वापर करून गाव हागदारीमुक्त मुक्त करणे हा मुख्य उद्देश आहे. केंद्र व राज्य शासनाच्या स्पर्धेत पोंभूर्णा तालुक्यातील काही गावे सहभागी झाली होती. या स्पर्धेत जी गावे निवडली गेली, अशा गावातील सरपंच व सचिव यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. मात्र आजमितीस पुरस्कार प्राप्त गावांचा आढावा घेतला असता, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसून येते. त्यामुळे शासनाच्या मूळ हेतुलाच हरताळ फासल्याचे स्पष्ट होत आहे. केवळ देखावा म्हणून पुरस्कारासाठी गावात स्वच्छता होत असेल तर त्याचा गावाला काय फायदा, ही स्वच्छता कायमस्वरुपी असावी असे मत गावातील काही सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत. पुरस्कार प्राप्त गावात नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र आहे. या गावांसह तालुक्यातील इतरही गावामध्ये अस्वच्छतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने ‘स्वच्छतेपासून समृद्धीकडे’चा नारा शासनाने दिला असून या अंतर्गत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, संपूर्ण स्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियान, स्वच्छ भारत मिशन अभियान यासारख्या योजना सुरू करून लोकसहभागातून ग्रामविकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये राज्यस्तर, विभास्तर, जिल्हास्तरावर लाखो रुपयाचे पुरस्कारही आहेत. मात्र गावांनी पुरस्कार मिळण्यापुरतेच गाव स्वच्छ केले, त्यामुळे या योजनेचे आधीच तीनतेरा वाजले आहेत. गावातील कुटुंबाकडे १०० टक्के शौचालय, स्वच्छतागृह, शोषखड्डे, व्यक्तिगत स्वच्छता, सांडपाणी, घर स्वच्छता असे निकष राखून देण्यात आले होते. मात्र या निकषांची कुठेही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळेच पुरस्कार प्राप्त गावामध्येच सर्वाधिक अस्वच्छता असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी) जनजागृतीचा अभाव तालुक्यातील बहुतांश अधिकारी, कर्मचारी सोईच्या ठिकाणी वास्तव्यास असतात. त्यांच्याकडून स्थानिक परिसरातील जनतेमध्ये पाहिजे तशी जनजागृती नसल्याने अनेक आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य शौचालय असून सुद्धा उघड्यावर शौचास जाताना दिसतात. त्यामुळे स्वच्छ अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.