शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने अनावश्यक खर्चाला आळा घालावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:08 IST

शहराच्या विकासासाठी मनपाने निधीची तरतूद केली. काही कामे सुरू आहेत. मात्र, बºयाच ठिकाणी अनावश्यक खर्च होत असून, या प्रकाराला आळा घालावा, ....

ठळक मुद्देमागणी : पालकमंत्र्यांना काँग्रेस नगरसेवकांचे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराच्या विकासासाठी मनपाने निधीची तरतूद केली. काही कामे सुरू आहेत. मात्र, बºयाच ठिकाणी अनावश्यक खर्च होत असून, या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदु नागरकर, माजी प्रदेश सचिव तथा नगरसेविका सुनिता लोढीया, असंघटीत कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद संकत, नगरसेवक अमजद अली, घनश्याम वासेकर, गौतम चिकाटे, श्याम राजुरकर, राजेंद्र आत्राम, वकार काझी, हरिदास लांडे, वैभव बानकर आदींनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.शिष्टमंडळाने विश्रामगृहात शहरातील विविध समस्यांवर चर्चा करून पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. महानगरपालिकाद्वारे डोअर-टू-डोअर कचरा जमा करण्यासाठी वार्षिक ५१ लाख खर्च केला जात आहे. हा खर्च ३६ लाख २१ हजार ४७९ रुपयांपेक्षा अधिक नाही. यातून वार्षिक २ कोटींचे नुकसान होत आहे. त्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून महानगरपालिकेने हे प्रकरण तीन सदस्यीय समितीसमक्ष ठेवून होणाºया खर्चाचे अवलोकन करावे. मनपाअंतर्गत घनकचरा डोअर-टू-डोअर जमा करावा. हा कचरा झंडी ते कंपोस्ट डेपोपर्यंत नेण्यासाठी ५२० महानगरपालिका कर्मचारी ज्यांचा वार्षिक खर्च पगाराच्या रुपाने रुपये १६ कोटी आहे. २२४ खाजगी कर्मचारी ज्यांचा खर्च रुपये ३.८० कोटी, डोर-टू-डोर कचरा जमा करण्यासाठी रुपये ६ कोटी, तसेच झंडी ते कंपोस्ट डेपो कचरा नेण्यासाठी रुपये ४ कोटी खर्च करण्यात येत आहे. एकूणच वार्षिक ३० कोटी रुपये महानगरपालिका खर्च करीत आहे. त्यामुळे प्रकरणाची दखल घेऊन नियमांपेक्षा जास्त होणारा खर्च कमी करून समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. शहरातील नवीन बांधकाम परवानगीसाठी महापालिकेने धोरण तयार करावे, खुल्या जागेवर अतिक्रमण करण्यास पायबंद घालावा, स्थायी समितीच्या सभापतींना तसे निर्देश द्यावे, अशी मागणीही केली आहे.