शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोग पीडिताच्या मदतीसाठी आॅटो संघटना सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:36 IST

सावली मार्गावरील प्रवाशांना आॅटोने ने-आण करणारे सुभाष शिवराम मॅकलवार हे काही दिवसांपासून कर्करोगाने ग्रासले आहेत.

ठळक मुद्देआर्थिक मदतीसाठी मिरवणूक : मदत करण्याचे आवाहन

भोजराज गोवर्धन ।आॅनलाईन लोकमतमूल : सावली मार्गावरील प्रवाशांना आॅटोने ने-आण करणारे सुभाष शिवराम मॅकलवार हे काही दिवसांपासून कर्करोगाने ग्रासले आहेत. आर्थिक परिस्थिती नाजूक असताना उपचारासाठी पैसे कुठून आणायचे, या समस्येत कुटुंब अडकले असतानाच मूल येथील एकता आॅटो चालक असोशिएनने सामाजिक दायित्व म्हणून शहरात आर्थिक मदतीसाठी मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये ४२ हजार रुपये जमा झाले. सदर आर्थिक मदत कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येणार आहे.सावली तालुक्यातील चारगाव येथील सुभाष शिवराम मॅकलवार हे सावली ते मूल मार्गावर मागील अनेक वर्षापासून आॅटो चालवून आपल्या कुटुंबाचे पालणपोषण करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या चेहºयावर लहानसा फोड झाला. त्यामुळे सुभाषने एका खासगी रुग्णालयात तपासणी केली. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीमध्ये कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी त्वरीत उपचार सुरु करण्याचा सल्ला दिला. मात्र सुभाषच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शास्त्रक्रियेसाठी येणारा खर्च कुटुंबियाना झेपण्यासारखा नव्हता. त्यामुळे मॅकलवार कुटुंबियाने नागरिकांना अािर्थक मदत करण्याचे आवाहन केले.याबाबतची माहिती मूल येथील एकता आॅटो चालक असोसिएशनच्या पदाधिकाºयांना मिळाली. दरम्यान चालकांनी बैठक बोलावून आर्थिक मदतीसाठी शहरात मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी बस स्थानकापासून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ४२ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा झाली.यावेळी एकता आॅटो चालक असोशिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ रामटेके, उपाध्यक्ष सलिम कुरेशी, सचिव विनोद पिंपळकर, सहसचिव सुनील कामडी, कोषाध्यक्ष जगदिश वाढई आदी सहभागी झाले होते. या मदतीने सुभाषच्या शस्त्रक्रियेचा खर्च पूर्ण होणारा नसल्याने बँक आॅफ महाराष्टÑ शाखा सावली येथील खाते क्रं. ६०२८२२१५८६९ मदत करण्याचे आवाहन कुटुंबियांनी केले आहे.