शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर उपनिरीक्षकांच्या बदल्यांकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:21 IST

चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी पोलीस प्रशासनात सुसुत्रता यावी यासाठी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकाच्या बदल्या करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

ठळक मुद्देअचानक झालेल्या बदलीने पोलीस निरीक्षकासोबतच जनतेला सुद्धा आश्चर्य वाटले.

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी पोलीस प्रशासनात सुसुत्रता यावी यासाठी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकाच्या बदल्या करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अचानक झालेल्या बदलीने पोलीस निरीक्षकासोबतच जनतेला सुद्धा आश्चर्य वाटले. आता हाच बदल उपनिरीक्षकांच्या बदल्यांतून दिसून येणार काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.तालुक्यातील ठिकाणावर बदल हवा यासाठी पोलीस अधीक्षकांनी केलेल्या बदल्या सर्वांना स्वागर्ताह असला तरी ऐन नवरात्रीत झालेल्या बदलाने पोलीस निरीक्षकांना जनतेशी जुळवून घेण्यास व योग्य घडी नीट बसविण्यात अवधी लागणार आहे. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकांच्या देखील बदल्या व्हाव्यात, असा सूर जनतेद्वारा उमटत आहे. याचे कारणही तसेच असून बढती झाल्यानंतर एकाच ठाण्यात ठाण मांडून बसणारे महाभाग मूल बरोबरच इतरही ठाण्यात आहेत. एकाच ठिकाणी वावरत असल्याने त्यांची पकड इतर अवैध धंदे करणाºयांसोबत चांगली जमल्याचे दिसून येते.पोलीस निरीक्षकांच्या बदल्या सर्वांना अचंबित करणाºया ठरल्या. या बदल्यावरुन नेहमी उन्हाळ्यामध्ये होणाºया बदल्यांना फाटा देत अवेळी बदल्या केल्याने सर्वांची भंबेरी उडाली. मात्र सर्वानी स्वत:ला सावरत वरिष्ठांचा आदेश मानत कामावर रूजू झाले.पोलीस प्रशासनात सूसत्रता आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी उचललेले पाऊन कौतुकास्पद आहे. मात्र अवैध काम करणाºया काहींना अस्वस्थ तर काहींच्या चेहºयावर हास्य फुलले आहे. ज्या ठाणेदारांनी अवैध धंदे करणाºयांवर जबर बसवले त्यांना ते ठाणेदार नको होते. काहीशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले त्यांना ठाणेदार हवे होते. मात्र ‘विंचवाचं बिºहाड पाठीवर’ या उक्तीप्रमाणे अधिकाºयांची बदली ठरली असल्याने त्यांचे बिºहाड पाठीवरच असते, हेच यावरुन दिसून येते.मूलमध्ये पोलीस उपनिरीक्षक ठाण्यातच मुक्कामाला आहेत की काय, असा भास होताना दिसतो. शिपायांपासून तर पोलीस उपनिरीक्षकापर्यंतचे अनेक जण याच ठाण्यात अथवा परिसरात फिरत असल्याने अवैध धंदे करणाºयांच्या ‘नाड्या’ त्यांना माहित आहेत. त्यामुळे केव्हा नाड्या दाबावच्या याची माहिती असल्याने त्याचा फायदा पोलीस उपनिरीक्षकांना होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या कराव्यात.