शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीकडे लक्ष

By admin | Updated: September 26, 2016 01:10 IST

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

ग्रामीण भागात उत्सुकता : ५ आॅक्टोबरला जाहीर होणार आरक्षण चंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नव्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघायला आतापासून सुरुवात झाली आहे. ग्रामीण राजकारणासाठी आरक्षण सोडतीची सर्वांना उत्सुकता लागली असून येत्या ५ आॅक्टोबरला जिल्हा परिषदेचे जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समित्यांचे तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे आपल्या गटातील व गणातील आरक्षण काय असणार, याकडे उत्सुक उमेदवारांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे विधानसभेच्या निवडणुकीसाठी रंगीत तालीम म्हणून पाहिले जाते. राजकीय पक्ष या निवडणुकीच्या यशापशावर निवडणुकीचे गणित लावतात. केंद्र व राज्यात सत्ताबदल घडविण्याची किमया मतदारांनी केली. आता मात्र मिनी मंत्रालयाच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंदाज बांधले जात आहेत. त्या अनुषंगाने निवडणुकीतील उमेदवाराची चर्चा करून चाचपणी करण्यास ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे. काहींनी ग्रामीण भागाच्या राजकारणात उतरण्यासाठी प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न चालविला आहे. कधी सामाजिक कार्यात न दिसणारे आता मतदारांत वावरू लागले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ५६ गट राहणार असल्याचे निश्चित करण्यात आले. १५ पंचायत समितीचे ११२ गण ठरविण्यात आले आहे. निवडणूक विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारूप मतदार यादीला अंतीम रूप देण्याचे कार्य सुरू केले आहे. जिल्हा परिषदेच्या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत जिल्हा परिषद गटाची एक तर पंचायत समिती गणाच्या दोन जागा आगामी निवडणुकीसाठी कमी करण्यात आले आहेत. राजुरा व कोरपना तालुका वगळता जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची मुख्य लढत काँग्रेस व भाजपात होत असते. चिमूर तालुक्यात आमदार बंटी भांगडीया यांच्या युवाशक्ती संघटनेने २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत चवथ्या स्थानावर झेप घेतली होती. आता मात्र ते भाजपाचे आमदार असल्याने आगामी निवडणुकीत काँग्रेससोबत त्यांना लढत द्यावी लागणार आहे.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ आॅक्टोबरची आरक्षण सोडत निघताच, ग्रामीण भागात मोर्चेबांधणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नजरा या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)