शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

अरविंडो कंपनीच्या संमतीसाठी गावकऱ्यांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:33 IST

भद्रावती : तालुक्यातील बेलोरा येथे अरविंडो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गावात विनापरवानगी इंग्रजी पत्राचा वापर करून सर्वेक्षण करून ...

भद्रावती : तालुक्यातील बेलोरा येथे अरविंडो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गावात विनापरवानगी इंग्रजी पत्राचा वापर करून सर्वेक्षण करून स्वाक्षरी करण्याचा प्रकार गावकऱ्यांनी हाणून पाडला. या प्रकाराने गावकऱ्यांना अंधारात ठेवण्याचा प्रकार उघड झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर तहसीलदारांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

बेलोरा गावाजवळील कोळसा खाणीचा ब्लॉक अरविंडो रियालिटी या कंपनीला मिळाला आहे. याकरिता कंपनीच्या हालचाली चालू झाल्या असून कायद्यानुसार शासकीय नियमानुसार गावात प्रकल्प चालू करण्यापूर्वी संबंधित गावकऱ्यांचे भूसंपादन, तसेच इतर बाबींसाठी कंपनीला संमती घेणे आवश्यक असते. मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या शासकीय नियमाला डावलून, कोणतीही सूचना न देता, गावातील ग्रामसभेची सहमती न घेता, येथील गावकऱ्यांना अंधारात ठेवून कंपनीचा ब्लॉक चालू करण्यासाठी सहमती तसेच सर्वेक्षणासाठी इंग्रजी फाॅर्मचा वापर करून गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचा प्रकार चालू केला होता. हा प्रकार भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश वानखेडे व गावकऱ्यांनी हाणून पाडला. हे प्रकरण पोलीस स्टेशननंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराबाबत तहसीलदार महेश शितोळे यांना चौकशीचे आदेश दिले.

बॉक्स

नियमाला तिलांजली

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नवीन कायद्यानुसार भूसंपादन तसेच कंपनी चालू करण्याचे सहमतीपत्र हे इंग्रजीमध्ये न देता मराठीत वापरायला पाहिजे होते, तसेच गावकऱ्यांची बैठक लावून याबाबत माहिती द्यायला हवी होती. मात्र शासकीय नियमांना डावलून कंपनी चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करीत असल्याचा प्रकार घडला आहे.

कोट

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार या प्रकाराबाबत चौकशी करण्यात आली. अरविंडो कंपनीला ब्लॉक रितसर मिळाला. मात्र कोणतीही कंपनी चालू करताना ८० टक्के गावकऱ्यांची सहमती असणे आवश्यक आहे. शासकीय नियमांचे पालन करावे लागते. गावकऱ्यांना विश्वासात न घेता सर्वेक्षण तसेच संमती घेण्याचा कंपनीचा प्रकार चुकीचा आहे.

- महेश शितोळे, तहसीलदार, भद्रावती.