शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सोमनाथ देवस्थानची संपत्ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मूल : तालुक्यातील पर्यटन स्थळ व श्रद्धास्थान असलेल्या सोमनाथ देवस्थानची चल व अचल संपत्ती हडपण्यासाठी नवीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मूल : तालुक्यातील पर्यटन स्थळ व श्रद्धास्थान असलेल्या सोमनाथ देवस्थानची चल व अचल संपत्ती हडपण्यासाठी नवीन न्यासाची घटना तयार करणे व नवनियुक्त सरपंचाना देवस्थानचा अध्यक्ष म्हणून कार्यभार देण्यास टाळाटाळ करणे, आदी बाबी केल्या जात असल्याचा आरोप नवनिर्वाचित सरपंच भिकारु शेन्डे व सदस्यांनी मूल येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

ग्रामपंचायत मारोडा अंतर्गत सोमनाथ देवस्थानचा कारभार चालवला जातो. देवस्थानचा कारभार सुरळीतपणे चालावा, यासाठी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था १९५०च्या अधिनियमानुसार सन १९६१ला मारोडाचे सरपंच जगन्नाथ नेरलवार यांनी न्यास निर्माण केला. या न्यासात ग्रामपंचायतीचे पाच सदस्य व गावातील १० ग्रामस्थ असे १५ सदस्य सोमनाथ देवस्थानचा कारभार सांभाळतील, असे ठरविण्यात आले. यात सरपंच हे पदसिद्ध अध्यक्ष राहतील, असे नमूद करण्यात आले. त्यानुसार सन १९६१ ते २०१५पर्यंत नऊ सरपंचांनी सोमनाथ देवस्थानचे अध्यक्षपद सांभाळले. सन २०१५मध्ये सरपंच झालेल्या स्वाती पुनकटवार व सदस्य पंकज पुल्लावार यांनी सोमनाथ देवस्थानची कुठलीही नियम व नियमावली नसल्याची संधी साधून धर्मदाय आयुक्त, चंद्रपूर येथे सोमनाथ देवस्थानची नवीन घटना तयार करुन मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला. याबाबत मारोडा येथील कुणालाही माहिती न देता, आडमार्गाने हे काम करण्यात आले.

सोमनाथ देवस्थानातील चल व अचल संपत्ती हडपण्यासाठी नवीन घटना तयार करणे, नवीन सरपंचाना देवस्थानचा कार्यभार न देणे आदी प्रकार केले जात असल्याचा आरोप सरपंच भिकारु शेन्डे व नवनियुक्त सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय न झाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बंडू गेडाम, अर्चना उइके, दर्शना मेश्राम, माधुरी निकेसर, सरिता ऊत्तलवार, सोनी मोहुर्ले, सचिन गुरुनुले आदी उपस्थित होते.