शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कोयत्याने वार करून शेतकऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:25 IST

आवाळपूर : तालुक्यातील आवाळपूर येथील शेतकरी अजित नामदेव बोधाने (४५) यांच्यावर त्यांच्याच शेतात जाऊन अविनाश बबन चौधरी व त्याच्या ...

आवाळपूर : तालुक्यातील आवाळपूर येथील शेतकरी अजित नामदेव बोधाने (४५) यांच्यावर त्यांच्याच शेतात जाऊन अविनाश बबन चौधरी व त्याच्या अन्य दोन साथीदारांनी कोयत्याने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

अजित नामदेव बोधाने हे नियमितपणे आपल्या शेतात काम करत असताना आवाळपूर येथील अविनाश बबन चौधरी व त्याचे साथीदार आकाश नामदेव घोटकर रा. आवाळपूर व विठ्ठल तुळशीराम चौधरी रा. हिरापूर हे दुचाकीने अजित बोधाने यांच्या शेताजवळ थांबले व बोधाने यांच्या मालकीचा शेतातील सोयाबीनच्या उभ्या पिकातून चालत जात असता अजित बोधाने यांनी त्यांना पिकाची नासाडी होत असल्याने शेतातून न जाता दिलेल्या रस्त्याने जायला सांगितले. यामुळे रागात अविनाश चौधरी व त्याच्या साथीदारांनी अजित बोधाने यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. कोयत्याने सपासप वार करून पळ काढला. जखमी अवस्थेत असलेल्या अजित बोधाने यांना दिलीप दुतकोर यांनी दुचाकीवर घेऊन पोलीस ठाणे गाठले व तत्काळ रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी आरोपी अविनाश बबन चौधरी, आकाश नामदेव घोटकर व विठ्ठल तुळशीराम चौधरी यांच्यावर कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ व कलम ३४ नुसार गुन्हा दाखल करीत अटक केली.