शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर वाहन चढविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: December 8, 2015 00:56 IST

नागपूर येथून चंद्रपूरकडे स्कोडा वाहनातून दारूची तस्करी होत असताना पोलिसांनी नंदोरी टोल नाक्यावर सदर वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला असता,..

दारूतस्कराचा प्रताप : नंदोरी टोल नाक्यावरील घटनानंदोरी : नागपूर येथून चंद्रपूरकडे स्कोडा वाहनातून दारूची तस्करी होत असताना पोलिसांनी नंदोरी टोल नाक्यावर सदर वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने पोलिसांच्या अंगावर वाहन नेण्याचा प्रयत्न केला. यात काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झालेत. पोलिसांनी नंतर सिनेस्टाईल त्याचा पाठलाग केला. मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असली तरी दारू तस्करांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. ५ डिसेंबरच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नंदोरी टोल नाक्यावर तपासणीकरीता पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यादरम्यान, एक टाटा इंडिका (एमएच ३४ के २२४५) कारला पोलिसांनी अडविले. त्याची तपासणी केली असता, सदर वाहनात १८ पेटी देशी दारू आढळून आली. ती पोलिसांनी जप्त करून चालकाला ताब्यात घेतले. काही वेळानंतर त्याच मार्गाने एक स्कोडा वाहन आले. तिला पोलिसांनी अडविण्यासाठी बॅरिकेटस् लावण्याचा प्रयत्न केला असता, स्कोडा चालकाने क्षणाचाही विलंब न करता गाडी वेगाने मागे घेतली. मागे घेताना काही पोलीस तेथे उभे होते. त्यांचीही पर्वा करता त्यांच्या अंगावर वाहन नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धावपळीत काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. मात्र पोलिसांजवळ यावेळी आवश्यक वाहन नसल्याने पोलीस सदर वाहनाला पकडू शकले नाहीत. या घटनेनंतर २० मिनिटांनी नागपूरहून येणारे एक स्कॉर्पिओ वाहन टोल नाक्यावर अडविण्यात आले. यावेळी सदर वाहनाचा चालक मद्य प्राशन करून होता. वाहनामध्ये ३० पेटी देशी दारू आढळून आली. पोलीसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला. आरोपी विक्की ऊर्फ रिचर्ड गॉडफी लेटर (२६) रा. संत मार्टीननगर जरीपटका नागपूर, अँथोनी क्रिष्मा ठाकूर (३८) रा. संत मार्टीननगर जरीपटका नागपूर, मनोज पाल (२५) रा. कन्हान (नागपूर) यांना अटक केली. (वार्ताहर)