शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल दुचाकी चोरट्याला अटक, नऊ मोटारसायकल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:26 IST

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेल्या नऊ दुचाकी जप्त केल्या आहे. प्रदीप उर्फ ...

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेल्या नऊ दुचाकी जप्त केल्या आहे. प्रदीप उर्फ सोनू केवळराम मेश्राम (२४) रा. रणमोचन असे आरोपीचे नाव आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी (खुर्द) विकास नगर येथील एका इसमाची नवीन दुचाकी ८ फेब्रुवारीला घराच्या अंगणातून चोरीला गेली होती. सदर इसमाने सर्वत्र शोध घेतला परंतु कुठेही दुचाकी मिळाली नाही. दुचाकी नवीन असल्याने दुचाकीची कागदपत्रेसुद्धा त्याच्याकडे नव्हती. ब्रह्मपुरी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. २२ मार्च रोजी डिबी पथकातील एक तुकडी शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना चोरीला गेलेली नवीन दुचाकीसह अन्य चोरीच्या दुचाकी आरोपी प्रदीप उर्फ सोनू केवळराम मेश्राम ‌त्याचा साथीदार सचिन ऊर्फ बादशाह नगराळे रा. सोमनाथपुरा राजुरा यांनी विक्रीसाठी रणमोचन येथे प्रदीप उर्फ सोनू मेश्राम याच्या राहत्या घराच्या मागील शिवारात तणसीने झाकून ठेवल्या असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केला असता त्याने चोरीची कबुली दिली. आरोपीकडून एकूण नऊ मोटारसायकल अंदाजे किंमत ५ लाख ५० हजार रुपये आढळून आल्याने प्रदीप उर्फ सोनू मेश्राम (२४) याच्याविरुद्ध ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात कलम 379 भादंवि अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे, अरुण पिसे, अमोल गिरडकर, योगेश शिवणकर, संदेश देवगडे, अजय कटाइत, मुकेश गजबे, विजय मैंद, नरेश कोडापे, शुभांगी शेमले यांनी केली.