शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांवर महिलांचा हल्लाबोल

By admin | Updated: August 21, 2015 01:40 IST

मेंडकी ग्रामपंचायत ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाते. येथील ग्रामपंचायतीचे वाद नेहमीच चर्चेचे विषय ठरत असतात.

मेंडकी : मेंडकी ग्रामपंचायत ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाते. येथील ग्रामपंचायतीचे वाद नेहमीच चर्चेचे विषय ठरत असतात. १५ आॅगस्ट रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत महिलांनी येथील सरपंचा मंगला मधुकर लोनबले यांच्यावर हल्लाबोल केल्याचा प्रकार घडला आहे.मेंडकी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे दुपारी २ वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेचे विषय रोजगार हमी अंतर्गत पांदण रस्ते आणि तंटामुक्त गाव समिती पूनर्गठीत करणे आदी अनेक होते. या ग्रामसभेला मेंडकी येथील जवळपास १२५ महिला व पुरुष उपस्थित होते. तंटामुक्ती समितीचे पूनर्गठन करताना शासनाच्या परीपत्रकानुसार समिती गठीत न करता ग्रामसभेने ठरविलेल्या काही टवाळखोर सदस्यांचा या समितीत भरणा केला आहे. यात शासन परिपत्रकाचे उल्लंघन करण्यात आले आहे. असे सूर येथील जनतेत निघताना दिसत आहे. तसेच ग्रामसभा सुरू असताना या ग्रामसभेत प्रत्येक विषयावर टवाळखोर पध्दतीने चर्चा केली जात होती. तसेच ग्रामसभा सरतेशेवटी रोजगार हमी या मुद्द्यावर चांगलीच सभा रंगली होती. ९ जानेवारी २०१५ रोजी कल्पना ठाकरे यांच्या शेतीजवळील पांदण रस्त्याचे रोजगार हमीचे मातीकाम सुरु करण्यात आले होते. पण हा पांदण रस्ता वन विभागाच्या जागेतून येत असल्याने येथील वन विभागाने या पांदण रस्त्याचे बांधकाम अडविले होते. या पांदण रस्त्यावरील अंदाजे ४५० मजूर मेंडकी येथील कामावर हजर होते. पंचायत समिती ब्रह्मपुरी येथील अधिकाऱ्यांनी माहिती देवून सदर पांदण रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर येथील सरपंचा मंगला मधुकर लोनबले या सदर रस्त्याच्या कामावर जाऊन काम कोणीही बंद करु नये, असे मजुरास सांगितले. मजुरी जर शासनाने नाही दिली तरी आपण स्वत: देऊ, असे पांदण रस्त्यावरील मजुरांना सांगितले. आणि मजुरांनी कामाला सुरुवात केली. परंतु आज आठ महिने लोटूनही या मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. या कारणामुळे ग्रामसभेत उपस्थित मजूर महिलांनी या विषयावरुन सरपंचा मंगला मधुकर लोनबले यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. वातावरण अधिक चिघळत असताना सभेचे अध्यक्ष तथा उपसरपंच यशवंत विनायक आंबोरकर आणि ग्रामसेवक राकेश श्रीराम साव यांनी या विषयावर नंतर तोडगा काढण्यात येईल, असे सांगून महिलांना शांत केले. अन्यथा हे प्रकरण अधिक तापले असते. (वार्ताहर)