शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लाल्या रोगाच्या आक्रमणाने कापसाचे पीक करपू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:37 IST

हातात आलेली पिके उन्हाच्या तडाख्याने आणि लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कुठे लाल पडली तर कुठे करपली जात आहे.

ठळक मुद्देजिवती तालुका : कृषी विभागाच्या अधिकाºयांचे मार्गदर्शन मिळेना

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : हातात आलेली पिके उन्हाच्या तडाख्याने आणि लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कुठे लाल पडली तर कुठे करपली जात आहे. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.पेरणीपूर्व व पेरणीनंतर शेतकºयांच्या बांधावर जाऊन कृषीवर आधारित शासन योजनांची पुरेपूर माहिती शेतकºयांना द्यायची असते. जेणेकरून शेतकºयांना तांत्रिक पद्धतीचा वापर करत कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येईल, ही त्यामागील शासनाची भूमिका आहे. मात्र पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरही कृषी अधिकारी व कर्मचारी पहाडावरील शेतकºयांच्या बांधावर पोहचले नाहीत.पहाडावर शेतकºयांना वर्षानुवर्षे निर्सगाच्या कचाट्यात सापडावे लागत आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, हे शेतकºयांना पाचविलाच पुंजले आहे. यावर्षीच्या खरिप हंगामातही पावसाने पाठ फिरवली.जुलै महिन्याच्या समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावले होते. सर्वत्र हिरवा शिवार दिसायले लागले होते. परंतु, मध्यतंरीच्या काळात पुन्हा पावसाने तब्बल महिनाभर दडी मारल्याने कोवळी पिके कोमेजून गेली होती. महिनाभरानंतर पाऊस झाल्याने कोमेजून गेलेली पिके वाचली. आता तरी पाऊस साथ देईल व भरघोस उत्पन्न घेता येईल, असे वाटत असतानाच निर्सगराजा पुन्हा रूसला आणि हाती आलेली उभे पीक रोगामुळे करपू लागले आहे. त्यामुळे अल्पावधीतच शेतकºयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.कुठे पावसाने पिके करपली तर कुठे लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कापूस पिके लाल पडली आहेत. कापूस पिकावर हिरवा रंग यावा यासाठी विविध कंपन्याची किटकनाशके फवारली जात आहेत. परंतु, पिकात कुठलाही बदल झालेला दिसत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. असे असतानाही कृषी अधिकारी व कर्मचारी शेतकºयांच्या बांधावर एकदाही भेट देत नसल्याने शेतकºयांना मार्गदर्शन मिळत नाही. अशा अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कृषी अधिकाºयांची अनियमित उपस्थितीजिवती येथील कृषी अधिकारी नियमित येत नाही. शेतकरी मेळावे किंवा शेतकºयांना लाभदायक मार्गदर्शन करीत नाही. त्यामुळे कृषी विभाग कार्यालयाचा शेतकºयांना कसलाच फायदा झालेला दिसत नाही. शेतकºयांच्या प्रश्नांकडे कृषी अधिकारीच दुर्लक्ष करीत असेल, तर शेतकºयांच्या समस्या सुटायच्या कशा, हा प्रश्नच आहे.पावसाची शेतकºयांना प्रतीक्षाचमागील आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे परिसरातील शेतातील पिके करपू लागल्याने बी-बियासाठी काडलेले कर्ज फेडायचे कसे, संसाराचा गाडा चालवायचा कसा, असे अनेक प्रश्न शेतकरी डोळ्यात अश्रू घेऊन बोलताना दिसत आहे. निर्सगाने शेतकºयांच्या चेहºयावरचे हास्यच हिरावून घेतल्याचे प्रत्यक्ष पीक पाहणीत आढळून आले.