शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी राहण्यावरून वातावरण तापले

By admin | Updated: October 24, 2015 00:34 IST

तालुक्यातील मौजा सकमूर येथील जिल्हा परिषद शाळेत एकूण सात शिक्षक कार्यरत आहेत.

वरिष्ठांकडे तक्रार : व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांकडून बचावगोंडपिंपरी : तालुक्यातील मौजा सकमूर येथील जिल्हा परिषद शाळेत एकूण सात शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी बरेच शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा पुढे करुन याबाबतची तक्रार शिक्षण विभागाच्या वरिष्ठांकडे केली. मात्र याच तक्रारी विरोधात शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या हितार्थ बचावात्मक पवित्रा घेतल्याने सकमुरात चांगलेच वातावरण तापले आहे.गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांचा मुख्यालयाला ‘खो’ हा मुद्दा सकमुरात गाजत असला तरी संपूर्ण तालुक्यात हा प्रकार सुरू आहे. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने मुख्यालयी राहावे तसेच नियोजित कर्तव्ये पार पाडावी, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र अलिकडच्या काळात ग्राम खेड्यात राहण्यास नापसंती दर्शविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज तालुक्यातील बहुतांश विभागाचे कर्मचारी मुख्यालयाला न राहता अधिकाऱ्यांशी समन्वय व मुकसंमती घेवून मुख्यालयाला ‘खो’ देवून घरभाडे, प्रवास भत्ता, नक्षलग्रस्त भत्ता आदी वेतनाअतिरिक्त भत्त्यांची उचल करीत आहे. यामुळे शासनाची अनेक कामे रेंगाळलेली असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो.अगदी याच मुद्दयावरुन तालुक्यातीेल सकरमूर गावातील जि.प. शाळा शिक्षक हे मुख्यालयी राहात नसल्याबाबतची तक्रार करण्यात आली. मात्र शिक्षक हितार्थ शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी वर्तमान पत्रातून शिक्षकांची बाजू मांडून शाळेची प्रगती होत असल्याची बाजू मांडली आहे. एकाच गावात वास्तव्यास राहणाऱ्या मात्र वेगवेगळी बाजू मांडणाऱ्या काही पालक तर काही नागरिकांमध्ये समन्वय नसल्याचे जाणवत असून शिक्षकांचा मुख्यालयाला खो हा मुद्दा आता तालुक्यात सर्वत्र चर्चील्या जात आहे. यासंदर्भात तेथील मुख्याध्यापिकांनी नवे कारण पुढे केले असून गणेशोत्सवादरम्यान सक्ती रकमेनुसार वर्गणी अदा न केल्याने सदर प्रकार घडल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एकंदरीत या सर्व प्रकारावरुन सकमूर गावात मुख्यालयाला खो या मुद्दयावरुन चांगलीच खडाजंगी उडाली आहे. तापलेल्या राजकारणाचे चटके हे विद्यार्थ्यांना बसू नये, याची खबरदारी पालकांसह शिक्षकांचीही आहे. हे तेवढेच सत्य. (तालुका प्रतिनिधी)