शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनाने निम्न पैनगंगा प्रकल्पाला गती मिळण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

आठवडाभरापूर्वी विधान परिषद प्रश्नोत्तरांच्या काळात दोन महिन्यात निर्णय घेऊन लवकरच कामाची निविदा काढण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले होते. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती प्राप्त होण्याची शक्यता आहे. निम्न पैनगंगा हा विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्रस्तावित सिंचन प्रकल्प आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी पाठपुरावा करून प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळवली होती. मात्र, निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीचा याला प्रखर विरोध होता.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील ताडसावली येथील निम्न पैनगंगा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्प फेररचनेचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे. आठवडाभरापूर्वी विधान परिषद प्रश्नोत्तरांच्या काळात दोन महिन्यात निर्णय घेऊन लवकरच कामाची निविदा काढण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले होते. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती प्राप्त होण्याची शक्यता आहे. निम्न पैनगंगा हा विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्रस्तावित सिंचन प्रकल्प आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी पाठपुरावा करून प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळवली होती. मात्र, निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीचा याला प्रखर विरोध होता. या प्रकल्पाविरोधात नागपूर, औरंगाबाद उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल व प्रलंबित होत्या. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना काही परवानग्या न मिळाल्याने प्रकल्पाचे काम बंद असून, तो रखडला आहे.२०१२मध्ये प्रस्तावित प्रकल्पाचे प्रत्यक्ष कामसुद्धा सुरू झाले होते. परंतु, परवानगी नसल्याचा आरोप धरणविरोधी संघर्ष समितीने केला. ऑक्टोबर २०१४मध्ये केंद्र सरकारने आवश्यक परवानगी दिल्या. मात्र, प्रकल्पाचे रखडलेले काम सुरू झाले नाही. तेलंगणा सरकारने महाराष्ट्र सरकारची परवानगी घेत धरणाच्या खालच्या बाजूच्या सीमेवर चनाखा कोर्टा येथे ३६० कोटी रुपये खर्चून बधारा बांधला. 

सध्या प्रकल्पाची किंमत २२ हजार कोटींच्या घरातप्रकल्पाला २७ जून १९९७ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यावेळी प्रकल्पाची किंमत १४०२ कोटी ४३ लाख रुपये होती. आजघडीला ही किंमत अंदाजे २२ हजार कोटींच्या घरात आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमता २२ हजार ७२७ हेक्टर आर. आहे. यात यवतमाळ जिल्हा एक लाख ४१ हजार ६०७ हेक्टर, चंद्रपूर जिल्हा ५८ हजार ३५५ हेक्टर, तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील २७ हजार ३०९ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येईल. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात शेती व उद्योगाला होईल.

निम्न पैनगंगा प्रकल्प कार्यालयाकडून नाशिक येथील राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे फेररचनेचा अहवाल तपासणीसाठी सादर करण्यात आला आहे. तसेच समितीमार्फत फेररचनेचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला आहे.- घनश्याम तोटे, कार्यकारी अभियंता, निम्न पैनगंगा प्रकल्प, यवतमाळ.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प