शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी गैरहजर कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांकडून पाठराखण

By admin | Updated: July 11, 2016 00:48 IST

सिंदेवाही तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ....

नागरिकांची मागणी : संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करानवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, कृषीविभाग, विद्युत कर्मचारी, पंचायत समिती,तहसील कार्यालय व इतर क्षेत्रात कार्यरत कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे आम जनतेची कामे खोळंबली जातात. त्यामुळे मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.आम आदमीचे अच्छे दिन येणार म्हणून लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत आश्वासनाची खैरात वाटण्यात आली. त्यामुळे राज्य व केंद्रात आम आदमीचे सरकार जनतेने बसविले. परंतु आम आदमीला चांगल्या दिवसांऐवजी वाईट दिवस पहावयास मिळत आहे. कोणतेही शासन आले तरी प्रशासनावर वचक नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आम आदमीला तेच ते दिवस भोगावे लागत आहे. शासनाच्या सेवेत समाविष्ट होत असताना कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहून कार्य करण्याची अट असते. त्यासाठी काहींना निवासस्थान उपलब्ध करुन दिल्या जाते तर काहीना घरभाडे भत्ता दिला जातो. त्यामुळे मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. परंतु कोणत्याही विभागाचा कर्मचारी मुख्यालयात न राहता शहराच्या ठिकाणावरुन ये-जा करीत असतो. त्यामुळे शासनाच्या विकास धोरणावर परिणाम होत आहे.शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. कागदपत्रे व विविध प्रकारचे दाखले वेळेवर मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागते. ही परिस्थिती प्रत्येक शासकीय कार्यालयाची आहे. कर्मचार मुख्यालयी राहात नसेल. पण अधिकारीही मुख्यालयी राहात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पाठराखण करण्याचे काम अधिकाऱ्यांकडून होत असल्याचे बोलले जाते. काही गावातील ग्रामसेवकांकडे दोन गावांचा कारभार असतो. तो कर्तव्यावर न जाताच बहाणे सांगून या गावी त्या गावी होतो, असे सांगत असल्याची ओरड जनतेने केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रति मूग गिळून असतात. त्यामुळे त्यांचे कुठेतरी साटेलोट असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मुख्यालयी राहत नसून खोटी माहिती देवून घरभाडे भत्ता उचलत असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीला चुना लागत आहे.शासनस्तरावरुन शासकीय कर्मचाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचा प्रकार करुन त्यांचे लाड पुरवित असल्याचे बोलले जात आहे. महिन्याकाठी हजारो रुपये पगार देवूनही कर्मचारी कर्तव्य निट पाडत नसेल तर अशा कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवून काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित करुन अनेक बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शासनस्तरावरुन शासकीय कर्मचाऱ्यांना कर्तव्य दक्षतेचा नियम घालून कडक निर्बंध घातल्यास कामचुकारगिरी कमी होणार, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश देवून आम जनतेच्या अडचणी व त्रास दूर करावा, अशी मागणी नागरिकांमध्ये होऊ लागली आहे.विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)